जम्मू-काश्मीर आणि लडाख केंद्रशासित प्रदेश! आजपासून होणार 'हे' बदल

जम्मू-काश्मीर आणि लडाख केंद्रशासित प्रदेश! आजपासून होणार 'हे' बदल

दोन्ही केंद्रशासित प्रदेशांवर पोलीस आणि कायदा सुव्यवस्थेवर थेट केंद्र सरकारचं नियंत्रण राहणार आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 31 ऑक्टोबर: जम्मू काश्मीरमध्ये 370 कलम हटवल्यानंतर आता नवीन बदल झाला आहे. ऑगस्ट महिन्यात संसदेत मंजूर झाल्याप्रमाणे बुधवारी (30 ऑक्टोबर) मध्यरात्रीपासून जम्मू काश्मीर आणि लडाख 2 नवे स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश म्हणून दर्जा मिळाला आहे. दोन्ही ठिकाणी अनेक नवे कायदे लागू करण्यात आले आहेत. गुरुवारपासून जम्मू काश्मीर आणि लडाखमध्ये आता पोलीस आणि कायदा सुव्यवस्थेवर थेट केंद्र सरकारचं नियंत्रण राहील. जम्मू काश्मीरच्या नायब राज्यपालपदी सनदी अधिकारी गिरीशचंद्र मुरमू तर लडाखचे राज्यपाल म्हणून आर. के. माथूर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आज श्रीनगर आणि लेह इथे होणाऱ्या कार्यक्रमात राज्यपालपदाची शपथ घेणार आहेत.

केंद्रशासित प्रदेशाला राज्याचा दर्जा मिळण्याची उदाहरण अनेक आहेत. मात्र राज्याला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्याचं हे पहिलंच उदाहरण आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्तानं आज दोन स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश म्हणून जम्मू काश्मीर आणि लडाखला दर्जा दिला जाणार आहे. 5 ऑगस्टला संसदेत मंजूर झालेल्या कायद्यानुसार जम्मू काश्मीरमधील केंद्रशासित प्रदेशाला विधीमंडळ असेल तर लडाख विधिमंडळाशिवाय केंद्रशासित प्रदेश असेल. असं असलं तरीही दोन्ही केंद्रशासित प्रदेशावर पोलीस आणि कायदा सुव्यवस्थेवर थेट केंद्र सरकारचं नियंत्रण राहणार आहे.

आजपासून होणार हे नवीन बदल

आतापर्यंत जम्मू काश्मीर हे एक संपूर्ण राज्य म्हणून ओळखलं जात होतं. विशेष राज्याचा दर्जा दिला जातं होता. मात्र कलम 370 हटवल्यानंतर आजपासून जम्मू काश्मीर आणि लडाख दोन केंद्रशासित प्रदेश अस्तित्वात आले आहेत.

जम्मू काश्मीरमध्ये विधिमंडळ असेल तर लडाखमध्ये विधिमंडळाशिवाय केंद्रशासित प्रदेश असेल.

जम्मू काश्मीरमध्ये राज्यपालपद होतं. या बदलानंतर दोन्ही राज्यांमध्ये उप-राज्यपालपद असणार आहे.

दोन्ही केंद्रशासित प्रदेशांचं न्यायालय एकच असेल मात्र न्यायाधीश स्वतंत्र असणार आहेत.

केंद्र सरकारच्या योजना, केंद्रीय मानवाधिकार आयोग कायदा, सूचना आणि अधिकार कायदा, संपत्तीविषय कायदा अशा वेगवेगळ्या 7 कायद्यांमध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत.

CCTV VIDEO: जेवण चांगल न दिल्याच्या रागातून वेटरला बेदम मारहाण

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 31, 2019 08:19 AM IST

ताज्या बातम्या