काश्मीर खोऱ्यात 4 दहशतवादी हल्ले, मेजरसह 4 जवान शहीद

काश्मीर खोऱ्यात 4 दहशतवादी हल्ले, मेजरसह 4 जवान शहीद

गेल्या काही दिवसांपासून काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांकडून जवानांना टार्गेट केलं जात आहे.

  • Share this:

श्रीनगर, 18 जून : गेल्या काही दिवसांपासून काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांकडून जवानांना टार्गेट केलं जात आहे.  जम्मू-काश्मीरमध्ये 24 तासांत भारतीय जवानांवर चार दहशतवादी हल्ले झाले. यानंतर भारतीय लष्कराकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे. या हल्ल्यांत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आलं. मात्र, या भ्याड हल्ल्यांना सडेतोड प्रत्युत्तर देत असताना एका मेजरसह चार जवान शहीद झाले आहेत. तसंच एका अधिकाऱ्यासह 18 जवान आणि दोन स्थानिक देखील जखमी झाले आहेत.

अनंतनाग चकमक, मेजर शहीद

अनंतनाग परिसरात दहशतवादी लपून बसल्याची माहिती जवानांना सोमवारी (17 जून) पहाटे मिळाली होती. यानंतर परिसरात शोधमोहीम राबवण्यात आली. यादरम्यान दहशतवाद्यांनी जवानांवर अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरुवात केली. यामध्ये मेजर केतन शर्मा शहीद झाले तर अन्य अधिकारी आणि दोन जवान जखमी झालेत. या चकमकीत एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यातही जवानांना यश आलं.

(पाहा :VIDEO : नवी मुंबईत शाळेजवळ आढळली बाँब सदृश वस्तू)

(पाहा :SPECIAL REPORT: FACEBOOK LIVE दोन भावांच्या जीवावर बेतलं, अपघाताने नागपूर हादरलं)

जवानांच्या वाहनावर IED स्फोटकांनी हल्ला, 5 जवान जखमी

पुलवामामध्ये दहशतवाद्यांनी सोमवारी (17 जून) पुन्हा एकदा लष्कारच्या ताफ्यावर IED स्फोटकांनी हल्ला केला. या हल्ल्यात 9 जवान आणि 2 स्थानिक जखमी झाले. या हल्ल्यास जवानांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आणि एक दहशतवाद्याला ठार केलं. दरम्यान, दहशतवादी मोठा हल्ला घडवण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे..

पुलवामा इथल्या ईदगाह अरिहल भागात हा हल्ला झाला. 44 राजपूताना रायफलचं पथक पेट्रोलिंगवर असतानाच हा हल्ला झाला. सतर्क जवानांनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं. जम्मू आणि काश्मीरच्या काही जिल्ह्यांमध्ये दहशतवादी मोठा हल्ला घडवून आणू शकतात अशी माहिती भारताला पाकिस्ताननेच दिली होती. त्यानंतर अमेरिकेनेही अशी माहिती दिली होती. त्यामुळे सुरक्षा दलाला हाय अलर्टवर ठेवण्यात आलंय.

14 जूनलाही झाली होती चकमक

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये 14 जून रोजीही चकमक सुरू होती. या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आलं होतं. अवंतीपोरा परिसरात दोन ते तीन दहशतवादी लपून बसल्याची माहिती जवानांना शुक्रवारी (14 जून) मिळाली होती. यानंतर जवानांनी चहुबाजूंनी परिसराला घेराव घालत शोधमोहीम राबवण्यास सुरुवात केली. यादरम्यान दहशतवाद्यांनी जवानांवर अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरुवात केली. यानंतर ज्या घरात दहशतवादी लपून बसले होते, घरच स्फोटकांनी उडवलं. ठार झालेले दहशतवादी लष्कर-ए-तोयबा संघटनेची संबंधित असल्याची माहिती समोर आली आहे. 'News18 India' नं दिलेल्या वृत्तानुसार, ठार मारण्यात आलेला एक अतिरेकी गुरुवारीच (13 जून) दहशतवादी संघटनेत सहभागी झाला होता.

(पाहा :प्रेयसीला शिकवायचा होता धडा, सिद्धिविनायक मंदिर उडवण्याची दिली धमकी)

सीआरपीएफ मुख्यालयावर ग्रेनेड हल्ला

यानंतर त्रालमध्ये सीआरपीएफच्या 180 बटालियनच्या मुख्यालयावर ग्रेनेड हल्ला करण्यात आला. अज्ञात हल्लेखोरांनी मुख्यालयातील जवानांना टार्गेट करण्यासाठी कट रचला होता. पण हे ग्रेनेड कॅम्पबाहेर पडून त्याचा स्फोट झाला. सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

रेल्वेचं रडगाणं आणि मुंबईकरांचा संताप, पाहा SPECIAL REPORT

First published: June 18, 2019, 11:26 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading