कुलगाममध्ये सुरक्षा दलाकडून 2 दहशतवाद्यांना कंठस्नान, सर्च ऑपरेशन सुरू

कुलगाममध्ये सुरक्षा दलाकडून 2 दहशतवाद्यांना कंठस्नान, सर्च ऑपरेशन सुरू

याआधी शोपियान जिल्ह्यात सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता.

  • Share this:

श्रीनगर, 10 ऑक्टोबर : जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. चिंगम परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे सर्च ऑपरेशन करण्यात आलं. यावेळी लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला आणि सुरक्षा दलानं त्याला चोख प्रत्युत्तर दिलं. यावेळी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाला यश आलं आहे. चिंगम परिसरात सुरक्षा दलाकडून सर्च ऑपरेशन सुरू आहे.

या आधी बुधवारी जम्मू-काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यात सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. तर तिसरा दहशतवादीही सकाळी मारला गेला. मिळालेल्या माहितीवरून सुरक्षा दलानं मंगळवारी सायंकाळी जनापोरा परिसरातील सुगन या गावात शोध मोहीम सुरू केली होती.

हे वाचा-माईक पेन्स यांचे गुलाबी डोळे असू शकतं का कोविड-19 चे दुर्मिळ लक्षण?

गेल्या काही दिवसांपासून दहशतवाद्यांच्या जम्मू-काश्मीरमध्ये कुरापती वाढल्या आहेत. त्यामुळे सर्च ऑपरेशन करून त्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाकडून मोठी मोहीम राबवली जात आहे. बुधवारी दहशतवाद्यांमधील एक म्होरक्या मारला गेल्याचीही माहिती सुरक्षा दलाकडून देण्यात आली होती. सध्या कुलगाम जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सर्च ऑपरेशन सुरू आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: October 10, 2020, 8:06 AM IST

ताज्या बातम्या