काश्मीरच्या कुलगाममध्ये एन्काऊंटर, 5 दहशतवाद्यांना केलं जागीच ठार

जम्मू-काश्मीरच्या कुलगाममधील चौगाममध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये शनिवारी मोठी चकमक झाली.

News18 Lokmat | Updated On: Sep 15, 2018 08:33 AM IST

काश्मीरच्या कुलगाममध्ये एन्काऊंटर, 5 दहशतवाद्यांना केलं जागीच ठार

जम्मू-काश्मीर, 15 सप्टेंबर : जम्मू-काश्मीरच्या कुलगाममधील चौगाममध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये शनिवारी मोठी चकमक झाली. या चकमकीत पाच दहशतवादी ठार झाले आहेत. सुरक्षा दल असलेल्या परिसरात दहशतवादी लपून बसले असल्याची माहिती मिळताच सापळा रचून हा हल्ला करण्यात आला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या चकमकीत तडीपार असलेला दहशतवादी हिज्बुल मुजाहिदीनचा कमांडर गुलजार पद्दार याला ठार करण्यात आलं आहे. 5 दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर बारामूला आणि काजीगुंडच्यामध्ये रेल्वे सेवा स्थगित करण्यात आली आहे.

Loading...

याआधी तीन वेगवेगळ्या चकमकींमध्ये, आठ दहशतवाद्यांना ठार करण्यात आलं आहे. यापैकी एका चकमकीत, पोलिस, अर्धसैनिक बलाचे 12 कर्मचारी आणि सैन्याचे कर्मचारी जखमी झालेत. ठार झालेल्या आठ दहशतवाद्यांपैकी तीन हे पाकिस्तानी होते.

कुपवाडा जिल्ह्यातील केरन सेक्टरमध्ये नियंत्रण रेखा जवळजवळ तीन जणांना ठार करण्यात आलं होतं. जैश-ए-मोहम्मद (जेईएम) च्या दोन अतिरेक्यांना सोपोर कस्बेमध्ये आणि जेईएमसंबंधी 3 पाकिस्तानी दहशतवाद्यांना रियासी जिल्ह्यामध्ये 33 तास सुरू असलेल्या लढाईनंतर मारण्यात आलं.

 

Viral Video : बेफाम नाचणाऱ्या या स्कूलगर्लच्या व्हिडिओतली ही मुलगी कोण?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 15, 2018 08:30 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...