S M L

बीएसएफच्या जवानांचं मोठं यश; 5 दहशतवाद्यांना केलं ठार

जैश-ए-मोहम्मद या संस्थेचे हे पाच दहशतवादी होते. गेल्या आठवड्यापासून ही दुसरी यशस्वी आणि मोठी कारवाई करण्यात आली आहे.

Sachin Salve | Updated On: Jan 15, 2018 11:58 AM IST

बीएसएफच्या जवानांचं मोठं यश; 5 दहशतवाद्यांना केलं ठार

15 जानेवारी : जम्मू-कश्मीरमध्ये लष्कराच्या जवानांना मोठं यश आलं आहे. घुसखोरी करणाऱ्या पाच दहशतवाद्यांना लष्कराच्या दवानांनी ठार केलं आहे. जैश-ए-मोहम्मद या संस्थेचे हे पाच दहशतवादी होते. गेल्या आठवड्यापासून ही दुसरी यशस्वी आणि मोठी कारवाई करण्यात आली आहे. गेल्या आठवड्यातली बीएसएफच्या जवानांनी घुसखोरीच्या तयारीत असलेले जवळजवळ 10 आतंकवाद्यांना ठार केलं होतं.

आज सकाळी लष्कराकडून पुन्हा ही मोठी कारवाई करत यश मिळवलेलं आहे. सध्या ही कारवाई जरी थांबली असली तरी जम्मू-कश्मीर परिसरात आणखी घुसखोरी करणारे दहशतवादी असल्याचं सांगण्यात येतं आहे. त्यामुळे बीएसएफचे जवान अगदी अलर्ट होऊन काम करत आहे.

काही दिवसांवर 26 जानेवारी आली आहे आणि याच मुद्द्यावर हे दहशतवादी आले का ? अशी शंकाही विचारण्यात येतेय. पण सुरक्षेच्या दृष्टीने सगळीकडे हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 15, 2018 11:58 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close