जय हो ! अनंतनाग चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा

जय हो ! अनंतनाग चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा

जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग परिसरात भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे.

  • Share this:

श्रीनगर, 17 जून : जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग परिसरात भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू आहे. या चकमकीमध्ये एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात जवानांना यश आलं आहे. दरम्यान, परिसरात आणखी काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती भारतीय लष्कराला मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण परिसराला घेराव घालण्यात आला असून शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अनंतनाग येथील एकिंगम परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सोमवारी (17 जून )सकाळी भारतीय जवानांना मिळाली. या माहितीच्या आधारे जवानांनी शोधमोहीम राबवण्यास सुरुवात केली. चहुबाजूंनी घेराव घातला जात असल्याचं लक्षात आल्यानंतर दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार करण्यास सुरुवात केली. या हल्ल्यास जवानांनीही चोख प्रत्युत्तर दिलं. प्रत्युत्तराच्या कारवाईत एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात जवानांना यश आलं.

(पाहा :VIDEO: 'फेसबुक लाईव्ह'मुळे गेला जीव, अपघाताचा थरार कॅमेऱ्यात कैद)

5 जवान शहीद

दरम्यान, यापूर्वी 12 जून रोजी CRPF जवानांवर अतिरेक्यांनी पुन्हा हल्ला केला होते. या आत्मघातकी हल्ल्यात 5 जवान शहीद झाले होते. अनंतनाग जवळच्या के.पी रोडवर हा हल्ला झाला होता.  पुलवामा हल्ल्यानंतरचा हा सर्वात मोठा आत्मघाती हल्ला आहे. पेट्रोलिंगसाठी जवानांचं वाहन जात असताना दहशतवाद्यांनी हल्ला केला. जवानांनीही या हल्ल्यास चोख प्रत्युत्तर दिलं. त्यात दोन दहशतवादी ठार झाले.  पुलमावा इथे 14 फेब्रुवारीला CRPF जवानांच्या ताफ्यावर हल्ला झाला होता. त्यात 40 जवान शहीद झाले होते.

(पाहा :फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात कोणाकडे कोणतं खातं? पाहा VIDEO)

18 महिन्यांमध्ये 357 अतिरेक्यांचा खात्मा

जम्मू आणि काश्मीरमध्ये लष्कराची दहशतवाद्यांविरुद्ध आक्रमक मोहीम सुरू आहे. गेल्या 18 महिन्यांमध्ये तब्बल 357 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात लष्कराला यश आलंय अशी माहिती लष्करी सूत्रांनी दिलीय. गेल्या सहा महिन्यांममध्ये पाकिस्तानने 1170 वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं असल्याची माहितीही सूत्रांनी दिलीय. लष्कराने दहशतवाद्यांविरुद्ध सर्वच स्तरांमधून मोहीम सुरू केलीय. धडक कारवाई करणं, लोकांमध्ये विश्वास निर्माण करणं आणि दहशतवाद्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करणं अशा प्रत्येक पातळीवर ही मोहीम हाती घेण्यात आली आहे.

(पाहा :VIDEO: 'विकासाची सगळी स्वप्न भंग, सरकार मात्र विस्तारात दंग')

'ऑपरेशन ऑल आऊट'

'ऑपरेशन ऑल आऊट' असं नाव या मोहिमेला देण्यात आलंय. गेल्या दोन वर्षांपासून लष्कराची ही मोहीम सुरू आहे. याच कारवाईत 20 जणांना अटकही करण्यात आली असून त्यांच्याकडून महत्त्वाची माहिती मिळत आहे. या मोहिमेत लष्कराने दहशतवाद्यांची एक हिट लिस्ट तयार केलीय. या यादीतल्या दहशतवाद्यांचा माग घेऊन त्यांना ठार केलं जातं किंवा अटक केली जाते. हे दहशतवादी काही घातपात घडविण्याच्या आधीच त्यांना संपवलं जातं. त्यांनी घातपात घडविल्यावर शोध घेण्यापेक्षा आधीच आक्रमक धोरण स्वीकारलं तर मोठी हानी टाळली जाते असं लष्कराचं मत आहे. पुलवामा हल्ल्याला जबाबदार असलेल्या आणि त्यांना मदत करणाऱ्या सर्वांना लष्कराने कारवाई करत महिनाभरातच यमसदनी पाठवलं होतं. लष्कर ही यादी सातत्याने अपडेटही करत असते.

VIDEO: अमोल कोल्हेंचं संसदेत पहिलं पाऊल, पाहा EXCLUSIVE मुलाखत

First published: June 17, 2019, 12:50 PM IST

ताज्या बातम्या