श्रीनगर, 11 ऑक्टोबर : जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फ्ररन्सचे नेता फारूक अब्दुल्ला यांनी रविवार केलेल्या वादग्रस्त विधानामुळे गोंधळ उडाला आहे. ते म्हणाले की, चीनला समर्थन दिल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा अनुच्छेद 370 लागू करण्याची आशा आहे. फारूक अब्दुल्ला पुढे म्हणतात की, अनुच्छेद 370 आणि अनुच्छेद 35 ए पुन्हा लागू करण्यासाठी आणि जम्मू-काश्मिरला राज्याचा दर्जा मिळवून देण्यासाठी ते प्रयत्नशील आहे.
संसदेच्या मान्सून सत्रादरम्यान फारुख अब्दुल्ला यांनी जम्मू-काश्मीरमध्ये 5 ऑगस्ट 2019 पूर्वीची परिस्थिती व्हावी अशी मागणी केली. ते पुढे म्हणाले की, काश्मीरमध्ये जी हालत आहे त्यावर मत व्यक्त करण्यासाठी आम्ही संसद भवनाकडे वेळ मागितली होती. मात्र आम्हाला वेळ देण्यात आली नाही. देशातील जनतेला हे माहीत व्हायला हवं की जम्मू-काश्मिरची स्थिती काय आहे व तेथील लोक कसे राहतात. इतरांबरोबर ते पुढे गेले आहेत की मागेच राहिले आहेत.
हे ही वाचा-अंगणात वाहत होता रक्ताचा पाट; नेत्यासह कुटुंबाची गळा चिरून हत्या, परिसरात खळबळ
संसदेच्या सत्रात फारुक अब्दुल्ला म्हणाले की, काश्मीरमध्ये अद्यापही परिस्थिती सुधारलेली नाही. इतर देशांमध्ये इंटरनेट 4जी चा वापर केला जात आहे, तर 5जी येणार आहे. मात्र येथे अद्यापही 2जीवर काम सुरू आहे. येथील तरुण कसा पुढे जाईल? येथील परिस्थितीत लोकांना माहीत व्हायला हवी. इतरांना ज्या सुविधा दिल्या जात आहेत, त्या आम्हाला का दिल्या जात नाहीत?
फारुक अब्दुल्ला पुढे म्हणाले की, येथे गरीबी खूप वाढली आहे. येथील अनेकांकडे रोजगार नाही. अब्दुल्ला लोकसभेत म्हणाले की, भारताला पाकिस्तानसोबत बातचीत करायला हवी. ज्या प्रकारे चीनसोबत बातचीत करण्याचा प्रयत्न केला जात आहे, त्याचप्रमाणे गुंतागुंत सोडविण्यासाठी पाकिस्तानशी चर्चा करायला हवी.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: China, Jammu and kashmir