श्रीनगर, 30 ऑगस्ट : दहशतवाद्यांचा मोठा कट सुरक्षा दलानं उधळून लावला आहे. 48 तासांत मोठी कारवाई करत 10 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय सैन्याला यश आलं आहे. शुक्रवारी 4 शनिवारी 3 आणि रविवारी 3 असे एकूण दहा दहशतवादी चकमकीदरम्यान ठार झाले आहेत.
श्रीनगरमधील पंथा चौक इथे सुरक्षा दलाला काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाली. त्यानंतर सर्च ऑपरेशन जारी कऱण्यात आलं. यावेळी दहशतवाद्यांकडून गोळीबार सुरू झाला. सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांच्या चकमकीत 3 दहशतवादी ठार झाले आहेत. अजूनही काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाली असल्यानं सर्च ऑपरेशन सुरू आहे.या चकमकीमध्ये जम्मू-काश्मीरच्या पोलीस जवान शहीद झाल्याची माहिती मिळाली आहे.
#UPDATE Srinagar encounter: 2 more terrorists killed (total 03). Operation going on. Further details shall follow: Kashmir Zone Police https://t.co/D8uWoxZhZ8
पुलवामा सेक्टरमध्ये शनिवारी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली होती. या चकमकीत सुरक्षा दलाकडून 3 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. त्याआधी शुक्रवारी शोपियान इथे चकमकीत 4 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाला यश आलं आहे. शुक्रवारी झालेल्या चकमकीत चार अतिरेकी ठार झाले, तर एकाला पकडण्यात यश आलं. तर रविवारी श्रीनगरमध्ये झालेल्या चकमकीत 3 जणांचा खात्मा करण्यात आला आहे.