श्रीनगर, 10 एप्रिल: जम्मू-काश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांची सुरक्षा काढून घेतल्यानंतर आता अन्य काही लोकांची सुरक्षा व्यवस्था काढून घेण्यात आली आहे. यामुळे राज्य पोलीस दलाला 2 हजार 700हून अधिक कर्मचारी सेवेत मिळाले आहेत. हे सर्व कर्मचारी आतापर्यंत राज्यातील विविध नेत्यांच्या सुरक्षासाठी तैनात होते.
केंद्रीय गृहमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात राज्यपाल शासन लागू झाल्यानंतर 919 अपात्र लोकांची सुरक्षा व्यवस्था काढून घेण्यात आली आहे. यात 22 प्रमुख फुटीरतावादी नेत्यांचा देखील समावेश आहे. या सर्व नेत्यांची सुरक्षा मागे घेतल्यामुळे राज्य पोलीस दलाला एकूण 2 हजार 786 कर्मचारी आणि 389 वाहने परत मिळाली आहेत. आता हे सर्व कर्मचारी सर्व सामान्यांच्या सुरक्षेसाठी तैनात केले जाणार आहेत. राज्यातील सुरक्षा व्यवस्था प्रभावी करण्यासाठी या कर्मचाऱ्यांचा वापर केला जाणार आहे. या संदर्भातील माहिती बुधवारी केंद्र सरकारने दिली.
सर्व जण देशविरोधी
देशविरोधी कारवाया केल्याने केंद्र सरकारने फुटीरतावाद्यांची सुरक्षा व्यवस्था काढून घेतली होती. यात जम्मू-काश्मीरमधील सैयद अली शहा गिलानी, अगा सैयद मौसवी, मौलवी अब्बास अन्सारी, यासीन मलिक, सलीम गिलानी, शाहिद उल इस्लाम, जफर अकबर भट, नईम अहमद खान, फारुख अहमद किचलू, मसरूर अब्बास अंसारी, अगा सैयद अब्दुल हुसैन, अब्दुल गनी शाह, मोहम्मद मुसादिक भट आणि मुख्तार अहमद वजा यांची सुरक्षा व्यवस्था काढून घेण्यात आली होती.
VIDEO : त्यावेळी नेमकं काय घडलं? गिरीश महाजनांचा खुलासा