S M L

शोधा राज्य/ मतदार संघ

जम्मू काश्मीरमध्ये 4 ठिकाणी चकमक सुरू, 3 दहशतवाद्यांचा खात्मा

शोपियानमध्ये लष्कर आणि केंद्रीय राखीव दलाच्या पोलिसांची संयुक्त कारवाई

Updated On: Mar 28, 2019 08:57 AM IST

जम्मू काश्मीरमध्ये 4 ठिकाणी चकमक सुरू, 3 दहशतवाद्यांचा खात्मा

श्रीनगर, 28 मार्च : जम्मू काश्मीरच्या दक्षिण आणि उत्तर भागातील चार ठिकाणी लष्कराची आणि पोलिसांची संयुक्त कारवाई सुरू आहे. शोपियानमधील केलर भागात झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाने तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं आहे. एका घरात तीन ते चार दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यानंतर लष्कराने सीआरपीएफ आणि जम्मू पोलिस यांच्या मदतीने संयुक्त मोहिम राबवली. तीन दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानंतर मोठा शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला आहे. अजूनही लष्कराची शोधमोहिम सुरू आहे.

गेल्या आठवड्याभरात जिल्ह्यातील ही दुसरी चकमक आहे. मागच्या आठवड्यात सुरक्षा दलाने इमामसाहीब भागात एका दहशतवाद्याला ठार केलं होतं.शुक्रवारी (22 मार्च) पहाटेच्या सुमारास शोपियान जिल्ह्यातील इमाम साहेब परिसरातही चकमक झाली. परिसरातील एका घरात दोन-तीन दहशतवादी लपून बसले होते. त्याचवेळी बांदीपोरा येथील चकमकीदरम्यान लष्कर-ए-तोयबाचा टॉपचा कमांडर अली भाईसहीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आलं. यात ठार करण्यात आलेला अली भाई हा पाकिस्तानातील दहशतवादी होता.

दरम्यान, बारामुल्ला जिल्ह्यात गुरुवारी (21 मार्च) झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांना जवानांनी कंठस्नान घातलं होतं.यामध्ये एका अधिकाऱ्यासहीत तीन जवान जखमी झाले होते.


VIDEO: ट्रॅफीकमुळे पार्थ पवारांना झाला उशीर, पाहा काय केलं

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 28, 2019 07:41 AM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close