जम्मू आणि काश्मीर : सुरक्षा दलाचं यश, 160 दिवसांत 136 अतिरेक्यांचा खात्मा

जम्मू आणि काश्मीर : सुरक्षा दलाचं यश, 160 दिवसांत 136 अतिरेक्यांचा खात्मा

दरवर्षी हिवाळा सुरू होण्याआधी काश्मिरात घुसखोरीत वाढ होते. हिमवर्षाव सुरू होण्याआधी अतिरेकी पाकिस्तान सीमेवरून भारतात घुसण्याचा प्रयत्न करतात.

  • Share this:

श्रीनगर 9 डिसेंबर : गेल्या 160 दिवसांमध्ये सुरक्षा दलाच्या कारवाईत 136 अतिरेक्यांना ठार झालेत. या कारवाईशी संबंधीत सूत्रांनी News18  ला सांगितलं की 25 जून ते 5 डिसेंबर या काळात 136 अतिरेक्यांचा खात्मा सुरक्षा दलाने केला. 25 जून ते 14 सप्टेंबर या  80 दिवसांमध्ये 51 अतिरेकी मारले गेले. तर त्याच्या पुढच्या अडीच महिन्यांमध्ये 85 अतिरेकी ठार झाले.

त्याचबरोबर दगडफेकीच्या घटनांमध्येही मोठी घट झाली आहे. 25 जून ते 14 सप्टेंबर या काळात दगडफेकीच्या 216 घटना घडल्या असून त्यात 8 लोकांचा मृत्यू झाला. नुकत्याच झालेल्या पंचायत निवडणुकीतही चांगलं मतदान झाल्यानं सुरक्षा दलाला दिलासा मिळालाय.

हिवाळ्यात जास्त घुसखोरी?

दरवर्षी हिवाळा सुरू होण्याआधी काश्मिरात घुसखोरीत वाढ होते. हिमवर्षाव सुरू होण्याआधी अतिरेकी पाकिस्तान सीमेवरून भारतात घुसण्याचा प्रयत्न करतात. हिमवर्षावाला सुरुवात झाल्यानंतर त्यांना दऱ्या खोऱ्यातून वाट काढणं शक्य नसतं. त्यामुळं नोव्हेंबर महिन्यात हे अतिरेकी नियंत्रण रेषा ओलांडण्याचा प्रयत्न करतात. पाकिस्तानी सैन्य या अतिरेक्यांना संरक्षण देण्यासाठी प्रचंड गोळीबार करतं त्यामुळं सुरक्षा दलाला ही घुसखोरी रोखणं आव्हान असंत.

ऑपरेशन ऑल आऊट

गेल्या दोन वर्षांपासून लष्करानं पोलिसांच्या मदतीनं अतिरेक्यांविरूद्ध धडक मोहिम सुरू केलीय. या मोहिमेत लष्करानं मोस्ट वॉन्टेंड दहशतवाद्यांची एक यादी तयार केली आणि त्या प्रत्येकाला शोधून ठार करण्याचं उद्दीष्ट ठेवलं. त्या पहिल्या यादीतल्या जवळपास सर्व दहशतवाद्यांना लष्करानं ठार केलं. ही यादी काही महिन्यानंतर सतत बदलत राहते.

याच मोहिमेत बुऱ्हान वाणी ठार झाला होता. अतिरेक्यांविरूद्धच्या मोहिमेत बचावात्मक पवित्रा न घेता आक्रमक धोरण सुरक्षा दलानं स्वीकारलं असून केंद्र सरकारनं सुरक्षा दलांना पूर्ण स्वातत्र दिलंय. त्यामुळं धड मोहिम राबविण्यात लष्कराला यश आलंय.

चार महिन्यात महिन्यातली संख्या अशी

जुलै - 11

ऑगस्ट - 28

सप्टेंबर - 29

ऑक्टोबर - 28

ही मोहिम राबवत असतानाच दहशतवादी संघटनांमध्ये सामील होणाऱ्या काश्मिरी युवकांना रोखण्यासाठीही लष्करानं खास मोहिम राबवलीय. स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणं, त्यांना शिक्षणाकडे वळवणं आणि पालकांचं प्रबोधन करणं हाही या मोहिमेचा एक भागच आहे.

अतिरेक्यांना रोखण्यासाठी केवळ गोळी हे उत्तर नसून 'गोलीसे नही, गले लगानेसे'ही काश्मीर प्रश्न सुटेल असं पंतप्रधानांनी म्हटलं होतं. त्यामुळं राजकीय आणि सुरक्षा या दोनही मार्गावर लष्कराला आणि प्रशासनाला चालावं लागणार आहे.

 

VIRAL VIDEO: कुख्यात गुंडाचा बारबालांसोबत 'तमंचे पे डिस्को'

First published: December 9, 2018, 11:22 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading