मराठी बातम्या /बातम्या /देश /

जामिया मारहाण प्रकरणी आत्तापर्यंतचा सगळ्यात धक्कादायक VIDEO व्हायरल

जामिया मारहाण प्रकरणी आत्तापर्यंतचा सगळ्यात धक्कादायक VIDEO व्हायरल

New Delhi: Policemen stand guard near Jamia Millia Islamia following the protests against Citizenship Amendment Act, in New Delhi, Sunday, Dec. 15, 2019. (PTI Photo/Atul Yadav) (PTI12_15_2019_000238B)

New Delhi: Policemen stand guard near Jamia Millia Islamia following the protests against Citizenship Amendment Act, in New Delhi, Sunday, Dec. 15, 2019. (PTI Photo/Atul Yadav) (PTI12_15_2019_000238B)

  • Published by:  Ajay Kautikwar
नवी दिल्ली 16 फेब्रुवारी : नवी दिल्लीतल्या जामिया मिलिया इस्लामीया इथं विद्यार्थ्यांनी CAA/NRC विरोधात केलेलं आंदोलनामुळे देशभर वातावरण तापलं होतं. या आंदोलनाला हिंसक वळणही लागलं होतं. बसेस जाळण्यात आल्या होत्या आणि तोडफोडही झाली होती. त्यानंतर सुरक्षा दलांनी विद्यापीठाच्या आवारात घुसून विद्यार्थ्यांवर लाढीमार केला होता. देशभर हे प्रकरण गाजलं. त्यावरून आरोप-प्रत्यारोप झाले. दावे-प्रतिदावे केले गेले. या प्रकरणी सुरक्षा दलाच्या जवानांच्या मारहाणीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला असून आत्तापर्यंतचा हा सर्वात धक्कादायक VIDEO असल्याचं म्हटलं जातं. विद्यापीठातल्या अभ्यासिकेतला हा VIDEO आहे. सर्व विद्यार्थी शांतपणे तिथे अभ्यास करत असल्याचं दिसतंय. ते अभ्यासात मग्न असताना जवान तिथे येतात आणि त्यांना काठ्यांनी मारहाण करतात असं त्यात दिसतंय. पोलिसांनी अतिशय निर्दयीपणे आम्हाला मारहाण केली असा आरोप विद्यार्थ्यांनी केला होता. आता हा नवा व्हिडीओ व्हायरल झाल्याने पुन्हा वादाची शक्यता व्यक्त केली जातेय. काय झालं होतं जामियात? नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून 15 डिसेंबरला जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात आंदोलन झाले होते. त्यावेळी हिंसाचाराच्या घटना घडल्या होत्या. याचे सीसीटीव्ही फूटेजही पोलिसांनी त्यावेळी जाहीर केलं होतं. सीसीटीव्हीमध्ये एक आंदोलक बाइकला आग लावतो त्यानंतर बस पेटवण्यासाठी आग लावलेली बाइक त्याखाली ढकलून देतो. दिल्ली पोलिसांनी जामियाजवळ झालेल्या हिंसाचारातील तीन सीसीटीव्ही फूटेज प्रसिद्ध केली आहेत. यामधील पहिल्या व्हिडिओत काही लोक एका बाइकला आग लावताना दिसत आहेत. दुसऱ्या व्हिडिओमध्ये आग लावण्यासाठी काही आंदोलक बाइकमधून पेट्रोल काढताना दिसतात. तर शेवटच्या व्हिडिओत बस जाळत असलेलं दिसत आहेत. दिल्ली पोलिसांनी हा व्हिडिओ 15 डिसेंबरचा असल्याचं म्हटलं आहे. यावरून आंदोलनावेळी हिंसाचार करणाऱ्यांची ओळख पटवणे शक्य होईल असंही पोलिसांनी म्हटलं होतं. दरम्यान हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी सरकारवर निशाणा साधलाय. पोलीस क्रुरपणे मारत असताना आतातरी कारवाई करावी आणि कारवाई केली नाही तर सरकारचा हेतू चांगला नव्हता हेच सिद्ध होतं असंही प्रियंका गांधी यांनी म्हटलं आहे.
First published:

Tags: Citizenship Amendment act

पुढील बातम्या