मराठी बातम्या /बातम्या /देश /

जामियात पोलिसांकडून मारहाणीआधीचा धक्कादायक VIDEO, विद्यार्थ्यांच्या हातात दगड?

जामियात पोलिसांकडून मारहाणीआधीचा धक्कादायक VIDEO, विद्यार्थ्यांच्या हातात दगड?

सुरक्षा दलाच्या जवानांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यांनंतर मोठी खळबळ उडाली होती. त्यानतंर आता विद्यार्थ्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

सुरक्षा दलाच्या जवानांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यांनंतर मोठी खळबळ उडाली होती. त्यानतंर आता विद्यार्थ्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

सुरक्षा दलाच्या जवानांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यांनंतर मोठी खळबळ उडाली होती. त्यानतंर आता विद्यार्थ्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

  • Published by:  Suraj Yadav
नवी दिल्ली 16 फेब्रुवारी : जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात विद्यार्थ्यांनी CAA/NRC विरोधात आंदोलनावेळी हिंसाचार झाला होता. यामुळे देशभरात वातावरण तापलं होतं. यानंतर आंदोलनात बसेस जाळण्याचे आणि तोडफोडीचे प्रकारही घडले होते. दरम्यान, या प्रकरणातील सुरक्षा दलाच्या जवानांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यांनंतर मोठी खळबळ उडाली होती. त्यानतंर आता विद्यार्थ्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. पहिल्या व्हिडिओमध्ये ग्रंथालयात सुरक्षा दलाकडून उपस्थित विद्यार्थ्यांना काठीने मारहाण करत असल्याचे दिसत होते. आता दुसऱ्या व्हिडिओत काही विद्यार्थी ग्रंथालयात घुसताना दिसत आहेत. या विद्यार्थ्यांच्या हातात दगड असल्याचंही दिसत आहे. पोलिसांनी लाठीचार्ज करण्याआधीचा हा व्हिडिओ असल्याचा दावा केला जात आहे. या व्हिडिओत काही विद्यार्थी ग्रंथालयात घुसताना दिसतात. त्यातील काहींच्या हातात दगड आहेत. ग्रंथालयात घुसल्यानंतर दरवाजेही बंद केल्याचं दिसतं. आता या व्हिडिओने पुन्हा खळबळ उडाली आहे. पहिल्या व्हिडिओमध्ये सर्व विद्यार्थी शांतपणे तिथे अभ्यास करत असल्याचं दिसतंय. ते अभ्यासात मग्न असताना जवान तिथे येतात आणि त्यांना काठ्यांनी मारहाण करतात असं त्यात दिसतंय. पोलिसांनी अतिशय निर्दयीपणे आम्हाला मारहाण केली असा आरोप विद्यार्थ्यांनी केला होता. आता हा नवा व्हिडीओ व्हायरल झाल्याने पुन्हा वादाची शक्यता व्यक्त केली जातेय. काय झालं होतं जामियात? नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून 15 डिसेंबरला जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात आंदोलन झाले होते. त्यावेळी हिंसाचाराच्या घटना घडल्या होत्या. याचे सीसीटीव्ही फूटेजही पोलिसांनी त्यावेळी जाहीर केलं होतं. सीसीटीव्हीमध्ये एक आंदोलक बाइकला आग लावतो त्यानंतर बस पेटवण्यासाठी आग लावलेली बाइक त्याखाली ढकलून देतो. दिल्ली पोलिसांनी जामियाजवळ झालेल्या हिंसाचारातील तीन सीसीटीव्ही फूटेज प्रसिद्ध केली आहेत. यामधील पहिल्या व्हिडिओत काही लोक एका बाइकला आग लावताना दिसत आहेत. दुसऱ्या व्हिडिओमध्ये आग लावण्यासाठी काही आंदोलक बाइकमधून पेट्रोल काढताना दिसतात. तर शेवटच्या व्हिडिओत बस जाळत असलेलं दिसत आहेत. दिल्ली पोलिसांनी हा व्हिडिओ 15 डिसेंबरचा असल्याचं म्हटलं आहे. यावरून आंदोलनावेळी हिंसाचार करणाऱ्यांची ओळख पटवणे शक्य होईल असंही पोलिसांनी म्हटलं होतं.
First published:

Tags: Delhi

पुढील बातम्या