जामीयात गोळीबार करणाऱ्या 'त्या' तरुणाचा हिंदू महासभा सत्कार करणार

जामीयात गोळीबार करणाऱ्या 'त्या' तरुणाचा हिंदू महासभा सत्कार करणार

त्याच्या कायदेशीर लढाईचा सर्व खर्च हिंदू महासभा करणार असल्याचं महासभेचे अध्यक्ष अशोक पांडे यांनी यांनी म्हटलं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली 31 जानेवारी : जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाच्या परिसात गोळीबार करणाऱ्या त्या माथेफिरू तरुणाचा सत्कार करण्यात येणार असल्याची घोषणा हिंदू महासभेने केलीय. या विद्यापीठाच्या परिसरात निदर्शने सुरु असताना हा तरुण मध्ये घुसला होता. त्यानंतर त्यांने आपल्या जवळच्या पिस्तुलाने गोळी झाडत काही घोषणाही दिल्या होत्या. त्यानंतर त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. हा तरुण हवेत पिस्तुल दाखवत घोषणाबाजी करत असतानाही पोलिसांनी त्याला रोखलं नाही असा अशी टीका होत आहे. आता हिंदू महासभेच्या या घोषणेमुळे नवा वाद निर्माण झालाय.

हा तरुणही नथुराम गोडसे याच्याप्रमाणेच सच्चा देशभक्त असल्याचं हिंदू महासभेने म्हटलं असं वृत्त टाईम्स नाऊने दिलंय. जामीयाच्या विद्यार्थ्यांना खरी आझादी देण्याचं काम या तरुणाने केलंय. त्यामुळे त्याच्या कायदेशीर लढाईचा सर्व खर्च हिंदू महासभा करणार असल्याचं महासभेचे अध्यक्ष अशोक पांडे यांनी यांनी म्हटलं आहे.

पोलिसांनी केलेल्या चौकशीदरम्यान आरोपीने अद्याप तो कोणत्या संघटनेशी संबंधित असल्याचे मान्य केले नाही. दिल्ली पोलिसांच्या (Delhi Police) सूत्रांनुसार आरोपी सोशल मीडिया (Social Media) वर व्हिडिओ बघून कट्टर झाला आहे. सूत्रांनी सांगितले की आरोपी अल्पवयीन असून त्याला जानेवारी 2018 मध्ये उत्तर प्रदेशातील कासगंजमधील चंदन गुप्ताच्या झालेल्या हत्येचा सूड घ्य़ायचा होता. दिल्ली पोलीस क्राइम ब्रांच या अल्पवयीन मुलाला शुक्रवारी किशोर न्याय बोर्डासमोर नेतील.

राष्ट्रपतींच्या भाषणात CAAचा उल्लेख, विरोधी खासदारांनी दिल्या शेम शेमच्या घोषणा

माझे एन्काऊंटर करा, पण...

दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनुसार आरोपीने सांगितल्यानुसार त्याला आपल्या कृत्याबद्दल अपराधीपणाची भावना नाही. माझं एन्काऊंटर करा, असेही तो पोलिसांना जबाब देताना म्हणाला. पोलिसांच्या सूत्रांनुसार तो अल्पवयीन तरुण दिल्लीला एकटा आला होता. त्यानंतर गुरुवारी दुपारी साधारण 11 वाजता तो जामिला पोहोचला. जामियामध्ये फायरिंग करण्यासाठी त्याने बुधवारी आपल्या गावातील एका व्यक्तीकडून बंदूक म्हणजेच कट्टा घेतला होता.

ऑपरेशन कोरोना: चीनमध्ये अडकलेल्या 400 भारतीयांच्या सुटकेसाठी विमान रवाना

जामिया नगरमध्ये सुधारित नागरिकत्व कायद्याच्या CAA विरोधात निदर्शनं सुरू असताना काल एका युवकानं गोळीबार केल्याचा VIDEO समोर आला आहे. या गोळीबारात एक तरुण जखमी झाला आहे. काल जामिया नगरची निदर्शनं हिंसक झाली होती. काल जामिया मिलिया इस्लामिया युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांनी CAA विरोधात निदर्शनं केली होती. त्यांचा जामिया ते राजघाट मोर्चा काढण्याचा बेत होता. या मोर्चादरम्यानच जमाव हिंसक झाला. यावेळी एका तरुणाने हातात पिस्तुल धरत घोषणाबाजी केली होती

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 31, 2020 02:59 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading