जामियात गोळीबार करत 'जय श्रीराम' म्हणणारा युवक म्हणाला, हवं तर माझं एन्काऊंटर करा...

जामियात गोळीबार करत 'जय श्रीराम' म्हणणारा युवक म्हणाला, हवं तर माझं एन्काऊंटर करा...

पिस्तुल दाखवणारा हा युवक 'जय श्रीराम', 'वंदे मातरम', 'हिंदुस्तान में रहना होगा वंदे मातरम कहना होता' अशा घोषणा देत होता

  • Share this:

नवी दिल्ली, 30 जानेवारी : जामिया मिलिया इस्लामिक (Jamia Millia Islamia) विद्यापीठाजवळ काल गुरुवारी पिस्टलने फायरिंग करणाऱ्या अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्य़ात घेतले आहे. मात्र आपण केलेल्या कृत्याबद्दल त्याला अपराधी वाटत नाही. पोलिसांनी केलेल्या चौकशीदरम्यान आरोपीने अद्याप तो कोणत्या संघटनेशी संबंधित असल्याचे मान्य केले नाही. दिल्ली पोलिसांच्या (Delhi Police) सूत्रांनुसार आरोपी सोशल मीडिया (Social Media) वर व्हिडिओ बघून कट्टर झाला आहे. सूत्रांनी सांगितले की आरोपी अल्पवयीन असून त्याला जानेवारी 2018 मध्ये उत्तर प्रदेशातील कासगंजमधील चंदन गुप्ताच्या झालेल्या हत्येचा सूड घ्य़ायचा होता. दिल्ली पोलीस क्राइम ब्रांच या अल्पवयीन मुलाला शुक्रवारी किशोर न्याय बोर्डासमोर नेतील.

माझे एन्काऊंटर करा, पण...

दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनुसार आरोपीने सांगितल्यानुसार त्याला आपल्या कृत्याबद्दल अपराधीपणाची भावना नाही. माझं एन्काऊंटर करा, असेही तो पोलिसांना जबाब देताना म्हणाला. पोलिसांच्या सूत्रांनुसार तो अल्पवयीन तरुण दिल्लीला एकटा आला होता. त्यानंतर गुरुवारी दुपारी साधारण 11 वाजता तो जामिला पोहोचला. जामियामध्ये फायरिंग करण्यासाठी त्याने बुधवारी आपल्या गावातील एका व्यक्तीकडून बंदूक म्हणजेच कट्टा घेतला होता.

जामिया नगरमध्ये सुधारित नागरिकत्व कायद्याच्या CAA विरोधात निदर्शनं सुरू असताना काल एका युवकानं गोळीबार केल्याचा VIDEO समोर आला आहे. या गोळीबारात एक तरुण जखमी झाला आहे. काल जामिया नगरची निदर्शनं हिंसक झाली होती. काल जामिया मिलिया इस्लामिया युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांनी CAA विरोधात निदर्शनं केली होती. त्यांचा जामिया ते राजघाट मोर्चा काढण्याचा बेत होता. या मोर्चादरम्यानच जमाव हिंसक झाला. यावेळी एका तरुणाने हातात पिस्तुल धरत घोषणाबाजी केली होती

ews18 Hindi ने दिलेल्या माहितीनुसार, पिस्तुल दाखवणारा हा युवक 'जय श्रीराम' आणि 'वंदे मातरम' घोषणा देत होता. 'हिंदुस्तान में रहना होगा वंदे मातरम कहना होता' अशाही घोषणा तो देत होता. जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाच्या पत्रकारिता अभ्यासक्रमाचा विद्यार्थी शादाब गोळीबारात जखमी झाला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 31, 2020 01:48 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading