पाहा VIDEO : कमाल! जेम्स बाँडच्या थाटात चालत्या रिक्षाचा बदलला टायर

पाहा VIDEO : कमाल! जेम्स बाँडच्या थाटात चालत्या रिक्षाचा बदलला टायर

तुम्ही जेम्स बाँडच्या फिल्मचे फॅन असाल तर हा व्हिडिओ तुम्हाला खरंच या हिरोची आठवण करून देईल. रिक्षा ड्रायव्हरने पॅसेंजरच्या सीटवर बसलेल्या माणसाची मदत घेऊन चालत्या रिक्षेत रिक्षाचा टायर बदलला. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

  • Share this:

मुंबई, 25 सप्टेंबर : तुम्ही जेम्स बाँडच्या फिल्मचे फॅन असाल तर हा व्हिडिओ तुम्हाला खरंच या हिरोची आठवण करून देईल.रिक्षातल्या पॅसेंजरच्या सीटवर बसलेल्या माणसाने चालत्या रिक्षेत रिक्षाचा टायर बदलला. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

जेम्स बाँड जेव्हा असे स्टंट करतो तेव्हा त्याच्याकडे अत्याधुनिक गॅझेट्स, शस्त्र सगळं काही असतं. जेव्हा त्याचे शत्रू त्याचा पाठलाग करत असतात तेव्हा तो मोठ्या शिताफीने त्याची कार दुरुस्त करतो. त्यामुळे एक टायर बदलून दुसरा लावणं हे त्याच्यासाठी काहीच मोठं नाही. पण हा रिक्षाचालक पॅसेंजरच्या मदतीने, त्याच्याकडे काहीही नसताना त्याच्या गाडीचा टायर बदलतो.

हर्ष गोएंका या व्यक्तीने हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केलाय. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्याला चांगलाच प्रतिसाद मिळाला.

या व्हिडिओत ही रिक्षा दोन चाकांवरच चालताना दिसतेय. टायर खराब झाल्याचं लक्षात आल्यावर पॅसेंजरच्या सीटवर बसलेल्या एकाने हा टायर लगेचच काढला. मागून येणाऱ्या दुसऱ्या रिक्षातल्या एका माणसाने त्याला दुसरा टायर दिला. त्या पॅसेंजरने हा टायर त्याठिकाणी लावला.

=======================================================================================

VIDEO : पवारांबाबत बोलताना उदयनराजेंना कोसळलं रडू, केली 'ही' घोषणा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 24, 2019 09:12 PM IST

ताज्या बातम्या