नात्याला काळीमा, 17 वर्षांच्या मुलीला साखळदंडाला बांधून बापच करत होता वारंवार बलात्कार!

नात्याला काळीमा, 17 वर्षांच्या मुलीला साखळदंडाला बांधून बापच करत होता वारंवार बलात्कार!

ही मुलगी जेव्हा आपला जीव वाचवून मामाच्या घरी पोहोचली तेव्हा तिच्या पायाला मोठी साखळी बांधलेले होती

  • Share this:

राजस्थान, 02 डिसेंबर :  हैदराबाद आणि रांची गँगरेप (Hyderabad Gangrape)  सारख्या घटनांनी अवघ्या देश हादरून गेला आहे. आता राजस्थानमध्येही नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. राजस्थानमधील जालोर भागात एका जन्मदात्या बापाने आपल्या मुलीला साखळ दंडाला बांधून वारंवार बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे.

पीडित 17 वर्षीय मुलीने जालोर येथील बागोडा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. तसंच आपल्या पित्याचे एका महिलेसोबत अनैतिक संबंध आहे, त्यांना एकत्र पाहिल्यामुळे वडिलांनी माझ्यावर अत्याचार केला, असा आरोपही तिने केला. 29 नोव्हेंबर रोजी ही घटना समोर आली.

जेव्हा या पीडित मुलीने आपल्या पित्याला एका महिलेसोबत पाहिलं होतं. त्यानंतर या पित्याने मुलीला घरात डांबून ठेवले. एवढंच नाहीतर कुठे वाच्यात होऊ नये म्हणून  साखळदंडाला बांधून ठेवलं. त्यानंतर या नराधम पित्याने आपल्याच मुलीवर वारंवार अत्याचार केले. काही दिवसानंतर या मुलीने तिथून कशीबशी सुटका केली आणि मामाचे घर गाठले. आपल्यासोबत घडलेला प्रसंग सांगितल्यानंतर थेट पोलीस स्टेशन गाठून नराधम बापाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली.  पोलिसांनी तक्रार दाखल करून वैद्यकीय चाचणीसाठी पीडित मुलाला शासकीय रुग्णालयात पाठवले.

मुलीच्या मामाने केली तक्रार दाखल

जालोर येथील बागोडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली. पीडित मुलीच्या मामाने याबद्दल तक्रार दाखल केली आहे. दाखल केलेल्या तक्रारीमध्ये, आरोपी हा पीडित मुलीच्या आईला बेदम मारहाण करत होता. त्यामुळे दोघांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर त्याने दुसरे लग्न केले.

आरोपीचे कुटुंबातील एका महिलेसोबत अनैतिक संबंध

पीडितेच्या मामाने पोलिसांना सांगितलं की, 'आरोपीच्या घरी मुलगी राहत होती. आरोपी पित्याचे कुटुंबातील एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते. एकदा या पीडित मुलीने दोघांना रंगेहाथ नको त्या अवस्थेत पकडलं. त्यामुळे त्या महिलेनं आणि पित्याने मुलीला पकडून घऱातील एका खोलीत डांबलं.  अनैतिक संबंधाची वाच्यात होऊ नये म्हणून साखळदंडाला बांधून ठेवले. काही दिवसांनी पित्यानेच तिच्यावर अत्याचार केले.'

ही मुलगी जेव्हा आपला जीव वाचवून कशी बशी मामाच्या घरी पोहोचली तेव्हा तिच्या पायाला मोठी साखळी बांधलेले होती आणि त्यावर तीन प्रकारे कुलुप लावलेले होते. पीडितेच्या मामांने आरोप केला आहे की, आरोपी हा आपल्या मुलीसोबत झोपत होता आणि अत्याचार करत होता.

या प्रकरणी आरोपी पित्यावर पोक्सो कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: Rape
First Published: Dec 2, 2019 10:23 PM IST

ताज्या बातम्या