PHOTOS : जल्लीकट्टूचा थरार, बंदी उठवल्यानंतर पुन्हा जीवाशी 'खेळ'

जल्लीकट्टू या साहसी खेळाची नाळ तामिळनाडूच्या कृषी संस्कृतीशी जोडलेली आहे.

  • Share this:

तामिळनाडूत अनेक ठिकाणी पारंपरिक जल्लीकट्टू या साहसी खेळाचं आयोजन करण्यात आलं होतं.

जल्लीकट्टू हा पोंगल सणानिमित्त खेळला जाणारा खेळ आहे. या खेळात लोक उत्साहानं सहभागी होतात.

यात वळूवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला जातो. या खेळात अनेकजण जखमी होतात. दरवर्षी अशा अनेक घटना घडतात.

या खेळात जिंकणाऱ्याला आणि ज्या वळूवर ताबा मिळवता आला नाही त्यांच्या मालकाला रोख रकमेचा पुरस्कार दिले जातात. तसेच वस्तू, टू-व्हिलर बक्षिस म्हणून दिलं जातं.

जल्लीकट्टू हा तामिळनाडूच्या गौरवाचं आणि संस्कृतीचं प्रतिक असल्याचं मानलं जातं.

पोंगल उत्सवात आयोजित केल्या जाणारा हा सण 2 हजार वर्षं जुना आहे.

तामिळनाडूच्या कृषी संस्कृतीशी या साहसी खेळाची नाळ जोडलेली आहे.

ल्ली

पोंगल सण चार दिवस साजरा केला जातो. त्यापैपी तिसरा दिवस जनावरांसाठी असतो.

या खेळात मैदानात सोडण्यात येणाऱ्या वळूच्या शिंगाला पैशांची पिशवी बांधलेली असते.

वळूला मोकळं सोडल्यावर त्याच्या शिंगाला बांधलेली पिशवी घेण्यासाठी लोक वळूवर ताबा मिळबण्याचा प्रयत्न करतात.

खरंतर जलीकट्टू हा सल्लीकासू या शब्दाचा अपभ्रंश आहे. सल्ली म्हणजे पैशाची थैली आणि कासूचा अर्थ बैलाचे शिंग असा आहे.

पुराणकाळात योद्धा आपल्या शक्तीचं प्रदर्शन करण्यासाठी अशा प्रकारचे खेळ आयोजित करत असत.

अलिकडच्या काळात जलीकट्टूचं स्वरुप बदललं आहे. तामिळनाडूत या खेळासाठी बैलांना विशेष तयार केलं जातं. यात बैलांना अमानुष पद्धतीने मारहाण करुन डिवचलं जातं.

बैलगाडी शर्यतीप्रमाणे या खेळावरही बंदी घालण्यात आली होती. मात्र यावरील बंदी चार वर्षांनी उठवण्यात आली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 15, 2019 02:46 PM IST

ताज्या बातम्या