OMG VIDEO : विमानं, जहाजं आणि फूटबॉल...पाण्याच्या टाक्यांचा अजब फंडा!

OMG VIDEO : विमानं, जहाजं आणि फूटबॉल...पाण्याच्या टाक्यांचा अजब फंडा!

पावसाळा असला तरी पाऊस कमी पडतोय आणि पाणी साठवून ठेवणंही महत्त्वाचं झालं आहे. आपल्याकडे पूर्वी घरांवर सिंटेक्सच्या पाण्याच्या टाक्या असायच्या. पण या टाक्यांच्या रंगामुळे, भल्यामोठ्या आकारामुळे घराची शोभा जायची. पण भारतात एक शहर असं आहे की ज्या शहरातल्या पाण्याच्या टाक्या हीच त्या शहराची ओळख आहे.

  • Share this:

जालंधर, 19 जुलै : पावसाळा असला तरी पाऊस कमी पडतोय आणि पाणी साठवून ठेवणंही महत्त्वाचं झालं आहे. आपल्याकडे पूर्वी घरांवर सिंटेक्सच्या पाण्याच्या टाक्या असायच्या. पण या टाक्यांच्या रंगामुळे, भल्यामोठ्या आकारामुळे घराची शोभा जायची. पण भारतात एक शहर असं आहे की ज्या शहरातल्या पाण्याच्या टाक्या हीच त्या शहराची ओळख आहे.

या पाण्याच्या टाक्या नाहीत तर भव्य कलाकृतीच आहेत. काही घरांवर तुम्हाला फूटबॉलच्या आकाराची पाण्याची टाकी दिसेल तर काही घरांवर कमळाच्या आकाराची. प्रत्येक घराची पाण्याची टाकी वेगळी. त्यामुळे पत्ता सांगतानाही इथले लोक या टाक्यांची ओळख सांगत असावेत !

खरंतर जालंधरमधल्या रहिवाशांना या अतरंगी पाण्याच्या टाक्यांचं वेड लावलं ते बलविंदर कौल आणि राम लुभाया कौल बापबेटा कलाकारांनी. जालंधरमध्येच एकाला फूटबॉलच्या आकाराची पाण्याची टाकी बनवून हवी होती. मग त्यानंतर एकेक कल्पना सुचत गेल्या.

जालंधरमधल्या या पाण्याच्या टाक्या बघून लोकांनी या दोघांना वेगवेगळे पुतळे करून घरावर लावण्याच्याही ऑर्डर दिल्या. त्या त्या घरावरचे पुतळे हे त्या घरमालकाच्या व्यक्तिमत्वाचं दर्शन घडवणारे आहेत.

घरांवर लावले पुतळे

जालंधरमध्ये बहुतांश रहिवासी NRI आहेत. ज्यांना विमानाने प्रवास करावा लागतो त्यांनी घरावर विमानच बनवून घेतलं आहे. कुणी लष्करात आहे तर कुणी नौदलामध्ये. मग त्यांनी आपल्या घरांवर रणगाडे, लढाऊ जहाजंही बनवून घेतली आहेत. जालंधरमधले एक जण ब्रिटनमध्ये रस्सीखेच या खेळाचे कोच आहेत. मग त्यांनी त्यांच्या घरावर रस्सीखेच खेळणारे खेळाडू बनवून घेतले आहेत

या पाण्याच्या टाक्या आणि पुतळ्यांमुळे त्या त्या घराचंच नाही तर जालंधरचंच एक रंगीबेरंगी रूप बनलं आहे. आता हे वेड पटियालामध्येही पोहोचलं आहे. हरियाणा, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, राजस्थान अशा राज्यांमधनूही कौल यांना ऑर्डर्स येऊ लागल्या आहेत.

त्यांच्या या पाण्याच्या टाक्या आणि पुतळे पाहून वाटतं, यह सिर्फ इंडिया में ही हो सकता है भाई!

===========================================================================================

वडिलांसमोर मुलाने धावत्या लोकल समोर मारली उडी, ठाणे स्टेशनवरचा LIVE VIDEO

 

First Published: Jul 19, 2019 08:53 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading