जालंधर, 10 जून : एकीकडे कोरोनाचं संकट असताना दुसरीकडे गुन्हेगारी प्रवृत्ती काही थांबत नाही आहे. पंजाबच्या जालंधरमध्ये लॉकडाऊनमध्ये आईच्या प्रेमाला काळीमा फासणारी घटना घडली. जालंधरमध्ये एका आईनेच आपल्या 6 वर्षांच्या मुलाची चाकूनं भोसकून हत्या केली. याचं कारण ठरलं राग.
जालंधरमधील सोहल जागीर नावाच्या गावात सोमवारी रात्री 10 वाजता ही घटना घडली. 6 वर्षांच्या एकुलत्या एका मुलानं आजी-आजोबांकडे झोपायला जाण्याचा हट्ट धरला म्हणून रागात आईनंच त्याचा खून केला. मृत मुलाचे आजोबा अवतार सिंग यांनी दिलेल्या माहितीत, सोमवारी रात्री त्यांची सून कुलविंदर कौर आणि सासू चरणजीत कौर यांच्यात वाद झाला होता. त्यांनंतर कुलविंदर मुलगा अर्शप्रीतला घेऊन आपल्या खोलीत गेली, आणि तिनं आतून टाळं लावून घेतलं. थोड्या वेळानं अर्शप्रीतच्या ओरडण्याचा आवाज येण्यास सुरुवात झाली. अवतार सिंग यांनी दार उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र कुलुप लावल्यामुळं त्यांना दार उघडता येत नव्हतं.
वाचा-लग्नास नकार दिला म्हणून भाच्यानं मामाचीच मुलगी पळवली, लपवलं ऊसाच्या फडात
अखेर थोड्यावेळानं दार उघडल्यानंतर अर्शप्रीतचा मृतदेह त्यांना दिसला. संपूर्ण खोलीत रक्त-रक्त झालं होतं. अवतार सिंग यांनी अर्शप्रीतला उचलण्याचा प्रयत्न केल्यानंतर कुलविंदर त्यांच्यावरही चाकू घेऊन धावून गेली.
वाचा-माओवाद्यांचा हिंसक चेहरा समोर, रात्रीच्या अंधारात कार्यालयात घुसले आणि...
अवतार सिंग यांनी सांगितले की, त्यांची सून कुलविंदर सिंगनं अर्शप्रीतचा खून केल्यानंतर स्वत: घराच्या गच्चीवरून खाली उडी मारली. जखमी अवस्थेत कुलविंदरला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दरम्यान कुलविंदरवर मुलांच्या हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाचा-धक्कादायक, मनसेच्या नेत्याने हॉस्पिटलमधून कोरोना रुग्णाला पळवले
संकलन,संपादन-प्रियांका गावडे.
Published by:Manoj Khandekar
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.