निवडणुकीवर दहशतवादी हल्ल्याचं सावट,'जैश-ए-मोहम्मद' पुन्हा घातपाताच्या तयारीत

निवडणुकीवर दहशतवादी हल्ल्याचं सावट,'जैश-ए-मोहम्मद' पुन्हा घातपाताच्या तयारीत

पुलवामा हल्ल्यानंतर दहशतवादी मोठा हल्ला घडवण्याच्या तयारी आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 17 एप्रिल : देशातील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दहशतवादी संघटना 'जैश-ए-मोहम्मद' घातपाताचा कट रचत आहे. गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 'जैश-ए-मोहम्मद'चे दहशतवादी जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग येथे मोठा हल्ला करण्याचा षड़यंत्र रचत आहेत. 22 एप्रिल ते 25 एप्रिलदरम्यान कधीही दहशतवादी भारतीय लष्कराच्या जवानांसहीत सर्वसामान्य नागरिकांना टार्गेट करू शकतात, अशी माहिती समोर आली आहे.

यापूर्वीही एप्रिल महिन्याच्या पहिल्या दोन आठवड्यांमध्ये जम्मू आणि कुपवाडा येथे दहशतवादी हल्ला घडवण्याचा कट रचण्यात आला होता. मात्र मतदानासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था पाहता दहशतवाद्यांचा घातपाताचा डाव फसला.

शिवाय, 14 एप्रिल रोजीदेखील श्रीनगरमध्ये हल्ल्याची योजना आखण्यात आली होती,अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आता मतदारांमध्ये भीती निर्माण करण्यासाठी दहशतवादी मतदानाच्या दिवशीच रक्तपात घडवण्याचा कट आखत आहेत. पुलवामा हल्ल्यानंतर दहशतवाद्यांकडून कित्येक मोठ-मोठे हल्ले घडवण्याची योजना आखली जात आहे. दहशतवादी कारवायांमुळे सीमारेषेवर तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये घुसखोरीचं प्रमाणही वाढलं आहे.

वाचा अन्य बातम्या

VIDEO: माढ्याच्या सभेत विजयसिंह मोहिते-पाटील यांच्याबद्दल काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

VIDEO: प्रेमीयुगुलाला अमानुष मारहाण; व्हिडिओ व्हायरल

SPECIAL REPORT: आश्वासनाचा पुणे पॅटर्न, हेल्मेटचं चिन्ह मिळताच सक्ती रद्द करण्याचं आश्वासन

VIDEO : राष्ट्रवादीच्या तळावर सर्जिकल स्ट्राईक, प्रीतम यांचं धनंजय मुंडेंवर टीकास्त्र

First published: April 17, 2019, 12:37 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading