जैश-ए-मोहम्मदची underwater wing सक्रिय; नौदल प्रमुखांनी दिला इशारा!

जैश-ए-मोहम्मदची underwater wing सक्रिय; नौदल प्रमुखांनी दिला इशारा!

काश्मीरमार्गे नव्हे तर अन्य मार्गाने भारतावर हल्ला करण्याचा कट पाकमधील दहशतवादी संघटना करत आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 26 ऑगस्ट: जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय लष्कराकडून दहशतवाद्यांना चोख उत्तर दिले जात आहे. त्याच मोदी सरकारने 370 कलम रद्द केल्यामुळे पाकिस्तानकडून पसरवल्या जाणाऱ्या दहशतवादाला मोठ्या प्रमाणात आळा बसला आहे. त्यामुळे काश्मीरमार्गे नव्हे तर अन्य मार्गाने भारतावर हल्ला करण्याचा कट पाकमधील दहशतवादी संघटना करत आहेत. यासंदर्भातील एक धक्कादायक खुलासा भारतीय नौदलाचे प्रमुख अॅडमिनरल करमबीर सिंग यांनी केला आहे.

काश्मीरमध्ये भारतीय लष्कराने दहशतवाद्यांना खात्मा करण्याचे मोहीम सुरु केली आहे. त्या पाठोपाठ पाकव्याप्त काश्मीरमधून होणारी घुसखोरी देखील भारतीय जवानांनी रोखली आहे. त्यामुळेच आता दहशतवादी संघटना भारतात हल्ले करण्यासाठी अन्य मार्गाचा अवलंब करत आहे. यासंदर्भात बोलताना अॅडमिनरल करमबीर सिंग म्हणाले, गुप्तचर विभागाने दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तानच्या जमीनीवरून कार्यरत असलेल्या जैश-ए-मोहम्मद ही दहशतवादी संघटना समुद्रमार्गे हल्ला करण्याची योजना आखत आहे. यासाठी ते दहशतवाद्यांना प्रशिक्षण देखील देत आहे. पण आम्ही अलर्ट आहोत आणि त्यांच्या प्रत्येक हलचालांवर लक्ष ठेवले आहे. यासंदर्भात काळजी करू नये.

दहशतवादी संघटना हल्ला करण्याच्या पद्धतीत बदल करत आहे. जैश दहशतवाद्यांना समुद्रमार्गे हल्ल्यासाठी प्रशिक्षण देत आहे. पण त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारच्या पाणबुडी(सबमरीन) नाहीत. ते केवळ दहशतवाद्यांना प्रशिक्षण देत आहेत. पण मी तुम्हाला दिलासा देतो की आम्ही पूर्ण अलर्ट आहोत आणि दहशतवाद्यांच्या कोणत्याही प्रकारच्या इराद्यांना यशस्वी होऊ देणार नाही, असे अॅडमिनरल सिंग म्हणाले.

पाक बिथरला : इम्रान खान यांनी दिली अणुयुद्धाची धमकी, महासत्तेलाही दिला हा इशारा

जैशच्या या दहशतवाद्यांच्या धोका भारतातील समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या महत्त्वाच्या शहरांना आहे. यात महाराष्ट्रातील मुंबईसह, गुजरात, गोवा, केरळ, तामिळनाडू ओडिशा आणि पश्चिम बंगाल या राज्यातील शहरांचा समावेश आहे. मुंबई, पणजी, कोच्ची, विशाखापट्टणम या ठिकाणी महत्त्वाची बंदरे आहेत.

SPECIAL REPORT : जागावाटपाचा तिढा, युतीतला ठरणार खोडा?

Published by: Akshay Shitole
First published: August 26, 2019, 9:27 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading