मुरादाबाद, 10 मे : उत्तराखंडमध्ये जैश-ए-मोहम्मदचे (Jaish E Mohammad) पत्र आल्यानंतर लगेचच उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथे रेल्वे स्थानक प्रमुखाच्या कार्यालयात एक पत्र आल्याने खळबळ उडाली आहे. पत्रात असे लिहिले आहे की, बरेली (Bareillu) आणि मुरादाबाद (Moradabad) परिसरातील काही रेल्वे स्थानकांना बॉम्बने उडवून टाकण्यात येईल.
या धमकीच्या पत्राने एकच खळबळ उडाली आहे. तसेच पत्र मिळाल्यानंतर स्थानिक प्रशासन आणि सुरक्षा संस्था सतर्क झाल्या आहेत. यानंतर संपूर्ण पोलीस आणि प्रशासनाने या पत्रासंबंधी तपास करायला सुरुवात केली आहे. हे पत्र जैश-ए-मोहम्मदचे आहे, असे सांगण्यात येत आहे.
वरिष्ठ विभागीय व्यावसायिक व्यवस्थापक (Sr. DCM) काय म्हणाले -
रेल्वे स्थानक प्रमुखाच्या कार्यालयात एक पत्र मिळाल्याची माहिती मुरादाबाद मंडळ उत्तर रेल्वेचे वरिष्ठ विभागीय व्यावसायिक व्यवस्थापक (Sr. DCM) सुधीर सिंह यांनी दिली. पत्रात लिहिले आहे की, बरेली मंडळ आणि मुरादाबाद मंडळातील काही रेल्वे स्थानकांना 21 मेला बॉम्बने उडवले जाईल. पत्रात हरिद्वारसह अनेक रेल्वे स्थानकांसोबत धार्मिक स्थळांना बॉम्बने उडवण्याची धमकी दिली जात आहे. या पत्रानंतर आम्ही सतर्क झालो आहोत. सुरक्षेची संपूर्ण व्यवस्था केली जात आहे. याप्रकरणाचा संपूर्ण कसून तपास केला जात आहे.
हेही वाचा - हरियाणात अटक केलेल्या 4 दहशतवादी महाराष्ट्रात मुक्कामी, कसे पोहोचले नांदेडमध्ये?
दरम्यान, उत्तराखंड राज्यातील रुरकी रेल्वे स्थानकाच्या अधीक्षकांना (Roorkee Railway Station) धमकीचे पत्र मिळाले. या पत्रात लक्सर, नजीबाबाद, डेहराडून, रुरकी, ऋषिकेश आणि हरिद्वार या रेल्वे स्थानकांनाही बॉम्बने उडवून टाकण्याची धमकी देण्यात आली आहे. (Threatening Letter) हे धमकीचे पत्र पाठवणाऱ्याने स्वत:ला दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचा एरिया कमांडर सलीम अन्सारी (Jaish E Mohammad Area Commander) असल्याचे सांगितले आहे.
यासंदर्भात माहिती देताना उत्तराखंडचे डीजीपी अशोक कुमार म्हणाले की, रुरकी रेल्वे स्थानक अधीक्षकांना 7 मे रोजी संध्याकाळी लक्सर, नजीबाबाद, डेहरादून, रुरकी, ऋषिकेश आणि हरिद्वार या 6 रेल्वे स्थानकांना उडवून देण्याची धमकी देणारे पत्र मिळाले. यासोबतच त्यांनी सांगितले की, 'धमकीचे पत्र जैशचा एरिया कमांडर सलीम अन्सारीच्या नावाने पाठवण्यात आले होते.' एएनआय या वृत्तसंस्थेसोबत केलेल्या संभाषणात त्यांनी सांगितले की, 'हा एक मानसिकदृष्ट्या अस्वस्थ व्यक्ती आहे, जो गेल्या 20 वर्षांपासून अशीच धमकीची पत्रे पाठवत आहे. तरीही खबरदारी घेतली जात आहे.'
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Indian railway, Terrorist, Uttar pradesh