पंजाबमध्ये 6 ते 7 दहशतवादी घुसले, RSS नेते आणि दिल्ली टार्गेटवर

पंजाबमध्ये 6 ते 7 दहशतवादी घुसले,  RSS नेते आणि दिल्ली टार्गेटवर

दहशतवादी घुसखोरी करून याच फिरोजपूर जिल्हात आले असून दिल्लीकडे कूच करण्याची या दहशतवाद्यांची योजना असल्याची माहिती आहे.

  • Share this:

चंदीगढ, 15 नोव्हेंबर : ‘जैश ए मोहम्मद’ या दहशतवादी संघटनेचे 6 ते 7 दहशतवादी पंजाबमध्ये घुसले आहेत, अशी माहिती पंजाब पोलिसांना गुप्तचर यंत्रणांकडून मिळाली आहे. खबरदारी म्हणून पंजाब पोलिसांनी दोन हाय अलर्ट जारी केले आहेत. दिल्लीवर हल्ला करण्याचं या दहशतवाद्यांचं षडयंत्र असल्याचीही माहिती आहे.

पंजाबच्या फिरोजपूर हा जिल्हा पाकिस्तानच्या सीमेलगत आहे. दहशतवादी घुसखोरी करून याच फिरोजपूर जिल्हात आले असून दिल्लीकडे कूच करण्याची या दहशतवाद्यांची योजना असल्याची माहिती आहे..

पंजाबमधीलच पठाणकोट इथल्या माधोपूरमधून चार अज्ञातांनी काही दिवसांपूर्वी एक गाडी लुटली होती. या घटनेचाही हल्ल्याच्या कारस्थानाशी काही संबंध आहे का, याबाबात आता तपास केला जात आहे.

संपूर्ण पंजाबमध्ये हाय अलर्ट

दहशतवाद्याचा धोका लक्षात घेता पंजाबमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. हे दहशतवादी रस्त्याने दिल्लीकडे येऊन मोठा घातपात करू शकतात. त्यातच त्यांना दिल्लीला पोहचणं शक्य न झाल्यास ते पंजाबवरही हल्ला करू शकतात.

RSS टार्गेटवर?

पंजाब पोलिसांकडून हल्ल्याचे आणखी दोन हाय अलर्ट जारी करण्यात आले आहेत. त्यातील एका अलर्टनुसार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) या संस्थेवरही हल्ला होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर दुसरीकडे पंजाबमधील राजकीय संभांवरही हल्ला होऊ शकतो, याबाबत अलर्ट जारी करण्यात आला आहे.

VIDEO: रेड लाईट एरियात कार अनेकांना गेली उडवत, 2 जणांचा मृत्यू

First published: November 15, 2018, 1:54 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading