'जैश-ए-मोहम्मद'चा म्होरक्या मसूद अझहरची पाकिस्तानकडून सुटका

'जैश-ए-मोहम्मद'चा म्होरक्या मसूद अझहरची पाकिस्तानकडून सुटका

जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरची प्रतिबंधात्मक तुरुंगवासातून सुटका करण्यात आली आहे.

  • Share this:

इस्लामाबाद, 09 सप्टेंबर: जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरची प्रतिबंधात्मक तुरुंगवासातून सुटका करण्यात आली आहे. पाकिस्तानने मसूद अझहरची सुटका केली आहे. पाकिस्तानकडून कारवाईचा फार्स केला जात आहे. पाकिस्तान छुप्या पद्धतीनं दहशतवादाला खतपाणी घालत आहे. पाकिस्तान पुन्हा मसूद अझहरचा वापर भारताविरोधा दहशतवादी हल्ल्यासाठी करण्याची शक्यता वर्तवली आहे. मसूद अझहर हा 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या पुलवामा हल्ल्याचा मास्टर माईंड होता. या हल्ल्यात CRPFचे 44 जवान शहीद झाले होते.

'पाकिस्तान अतिरेक्यांना अटक करतो असं सांगून कारवाईचा देखावा करत आहे. अमेरिका पाकिस्तानच्या या नापाक कारवाईवर विश्वास ठेवते. मात्र काही काळानंतर पाकिस्तान अतिरेक्यांची सुटका करून दहशतवादाला खतपाणी घालत आहे. त्यामुळे भारताविरोधात पुन्हा एकदा मसूद अझरचा वापर पाकिस्तान करू शकतो अशी आता भीती निर्माण झाली आहे'. अशी प्रतिक्रिया सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी दिली आहे.

हे वाचा- (कोणता झेंडा घेऊ हाती? उदयनराजेंनी बोलावली कार्यकर्त्यांची बैठक)

जम्मू-काश्मीरमधील कलम 370 रद्द केल्यानंतर भारत-पाकिस्तान संबंधांमध्ये तणाव

जम्मू-काश्मीरमधील 370 कलम रद्द केल्यानंतर भारत-पाकिस्तानमधील संबंध अधिक तणावाचे झाले आहे. पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय पातळीवर वारंवार प्रस्ताव देऊनही कलम 370 बाबत मोदी सरकारने घेतलेला निर्णय मागे घेतला नाही. त्यामुळे पाकिस्तानची अधिक कोंडी झाली. इम्रान खान सरकारने राजस्थान आणि भारत पाकिस्तान सीमा रेषेवर जादा सैन्य तैनात केलं आहे. दुसरीकडे जम्मू-श्रीनगरच्या वेगवेगळ्या सेक्टरमध्ये दहशतवाद्यांच्या कुरापती सुरूच आहेत.

कोण आहे दहशतवादाचा क्रूर चेहरा मसूद अझहर?

जगातला दहशतवादाचा क्रूर चेहेरा असलेला जैश ए मोहंमद या दहशतवादी संघटनेचा प्रमुख मौलान मसूद अझहर मोस्ट वॉन्टेंड आहे. अफगाणिस्तानातून दहशतवादी कारवायांना सुरूवात केलेल्या मसूदने पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेच्या मदतीने भारतात अनेक मोठे हल्ले घडवून आणले होते.

हे वाचा-'लोकसभेच्या निवडणुकीत भाजपनं बारामतीकरांची झोप उडवली')

कंदहार विमान अपहरणानंतर जैश-ए-मोहम्मदला बळ

1999 च्या कंदहार विमान अपहरणापासून जैशने आपल्या कारवायांना सुरुवात केली. 1994 ला काश्मीरमध्ये सक्रिय असलेल्या हरकत-उल-मुजाहिद्दीनचा सदस्य असल्याच्या कारणावरुन अजहर मसूदला अटक केली होती. त्याला सोडवण्यासाठी विमानाचं अपहरण करण्यात आलं होतं.

मसूद अजहरच्या सुटकेसाठी विमानाचे अपहरण

भारतातील तुरुंगात असलेल्या मौलाना मसूद अझहर, मुश्ताक जरगर आणि शेख अहमद उमर सईद या दहशतवादी आणि म्होरक्यांच्या सुटकेची मागणी करत विमानाचे अपहरण केलं होतं.  अपहृत विमानात 168 प्रवासी होते. त्यांच्यासह विमान कंदहारला नेण्यात आलं होतं. शेवटी सहा दिवसांनी देशभरातून दबाव वाढू लागल्याने तत्कालिन भाजप सरकारने तिघांना तुरुंगातून मोकळं करत ओलीस ठेवण्यात आलेल्यांची भारतीय नागरिकांची सुटका करुन घेतली होती.

भारतात दहशतवादी हल्ले

2000 मध्ये जैश-ए-मोहम्मदची स्थापना केली आणि मसूद अजहरने भारतात अनेक दहशतवादी हल्ले घडवून आणले. यावेळी इतर काही संघटनामधील दहशतवादी जैशमध्ये सहभागी झाले. स्थापनेनंतर दोन महिन्यात जैश-ए-मोहम्मदने श्रीनगरमधील बदामीबाग येथे लष्कराच्या मुख्यालयावर आत्मघाती हल्ला केला होता. त्यानंतर लगेच जम्मू काश्मीरमधील सचिवालयाच्या इमारतीवर हल्ला केला होता.

हे वाचा-लुच्चे लफंगे यांचं तोड परळीच्या महिलाच बंद करतील - पंकजा मुंडे

पुलवामाप्रमाणेच श्रीनगरमध्ये हल्ला

ज्याप्रमाणे पुलवामा येथे स्फोटकांनी भरलेली गाडी सीआरपीएफच्या गाडीला धडकवली त्याच पद्धतीने 24 सप्टेंबर 2001 ला श्रीनगरमध्ये विधानसभा भवनात गाडी घुसवली होती. यात 38 लोकांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्याची जबाबदारीही जैश-ए-मोहम्मदने घेतली होती.

संसदेवर आणि पठाणकोट हल्ल्यामागे जैश-ए-मोहम्मद?

भारताच्या संसदेवर 13 डिसेंबर 2001 ला झालेला हल्ला आणि दोन वर्षांपूर्वी 2016 ला पठाणकोट येथे हवाईदलाच्या तळावर झालेल्या हल्ल्याला जैश-ए-मोहम्मद ही दहशतवादी संघटनाच जबाबदार असल्याचे म्हटले जाते.  संसदेवरील हल्ल्यातील दोषी अफजल गुरू हा जैश संघटनेच्या कारवायांमध्ये सहभागी होता. त्याला 2013 मध्ये फाशी देण्यात आली. उरी येथे 2016 मध्ये भारताच्या लष्करी ठाण्यांवर झालेल्या हल्ल्याला जैशला जबाबदार धरलं जातं. या हल्ल्यात भारताचे 18 जवान शहीद झाले होते. त्यानंतर भारताने पाकिस्तानात घुसून सर्जिकल स्ट्राईक केला होता.

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

VIDEO : प्रकाश आंबेडकरांबद्दल वापरला अपशब्द, वाहन निरीक्षकाला कार्यालयात घुसून मारलं

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 9, 2019 09:32 AM IST

ताज्या बातम्या