हवाईदलाचं 'मीग-27' विमान कोसळलं, 12 दिवसांमधली दुसरी घटना

हवाईदलाचं 'मीग-27' विमान कोसळलं, 12 दिवसांमधली दुसरी घटना

गेल्या 12 दिवसांमधली लढाऊ विमान कोसळण्याची ही दुसरी घटना आहे.

  • Share this:

जैसलमेर 12 फेब्रुवारी : राजस्थानातल्या जैसलमेरमध्ये मंगळवारी हवाईदलाचं आणखी एक लढाऊ विमान कोसळलं. या अपघातात वैमानिक सुरक्षीत बाहेर पडला. गेल्या 12 दिवसांमधली लढाऊ विमान कोसळण्याची ही दुसरी घटना आहे. नियमित सरावासाठी हे विमान निघालं होतं. पोखरण विभागात ही घटना घडली. सायंकाळी 6.10 मिनिटांनी हा अपघात झाल्याच प्रशासनाने सांगितलं आहे. घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

मिग-27 हे रशियन बनावटीचं विमान आहे. भारताने 1980 च्या दशकामध्ये या विमानाची खेरदी केली होती. 1999 च्या कारगिल युद्धाच्या वेळी याचा चांगला उपयोग झाला होता. या लढाऊ विमानाने पहाडांवर असलेल्या पाकिस्तानी अतिरेक्यांवर जोरदार हल्ला केला होता.

भारताने आता मीग 27 विमानांना ताफ्यातून काढून टाकलं आहे. 2001 ते 2010 या काळात 12 मिग 27 विमानांचा अपघात झाला होता. त्यामुळे त्यांना 'फ्लाइंग कॉफिन' असंही नाव पडलं होतं. अपघातांची संख्या वाढल्याने फेब्रुवारी 2010 मध्ये 150 पेक्षा जास्त  मिग 27 लढाऊ विमानांच्या उड्डाणांवर बंदी घालण्यात आली होती.

VIDEO : मुंबईतील सर्व जागा मोदी जिंकतील - आशिष शेलार

First published: February 12, 2019, 9:02 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading