फेसबुकवर पत्नी करायची VIDEO शेअर, फॉलोअर्स वाढले म्हणून चिडून पतीने केलं खल्लास

फेसबुकवर पत्नी करायची VIDEO शेअर, फॉलोअर्स वाढले म्हणून चिडून पतीने केलं खल्लास

फॉलोअर्स वाढले म्हणून पतीनं रागात पत्नीलाच केलं कायमचं लॉगआउट!

  • Share this:

जयपूर, 21 जानेवारी : जयपूरमध्ये सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर केल्यामुळं एक महिलेला आपला जीव गमवावा लागला. खरं तर, पत्नीच्या फेसबुकवर 6000 हून अधिक फॉलोअर्स झाले होते आणि ती मोबाइलमध्ये सतत व्यस्त असायची. पत्नीच्या या सवयीला कंटाळून पतीनं कट रचून पत्नीची हत्या केली.

ही घटना जयपूरच्या अंबर पोलीस स्थानक भागातील आहे. जयपूर पोलिसांना काही दिवसांपूर्वी रक्ताने माखलेला महिलेचा मृतदेह सापडला होता. या प्रकरणी चौकशी करत असताना खुनाच्या आरोपाखाली पोलिसांनी महिलेचा नवरा अयाज अहमद याला अटक केली आहे.

वाचा-'बाबा जिवंत असते तर...' वडिलांचं छत्र गमावलेल्याचे शब्द ऐकून डोळ्यात येईल पाणी

या प्रकरणाचा खुलासा करत असलेले अतिरिक्त पोलिस आयुक्त गुन्हे अशोक कुमार गुप्ता यांनी, दिल्ली महामार्गावरील एका मंदिराच्या रस्त्यालगत महिलेचा रक्ताने माखलेला मृतदेह सापडला होता. या महिलेची स्कूटी आणि हेल्मेट देखील जवळच आढळले ज्यामुळे तिची ओळख पटली.

वाचा-राज ठाकरे इज बॅक! शिवसेनेच्या गडाला सुरुंग लावण्यासाठी मनसेचा मेकओव्हर

दोघांना 3 महिन्यांचा मुलगाही आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी अयाज अहमद आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत असे. लग्नानंतर दोघांमध्ये वाद झाला आणि रेश्मा गेल्या 1 वर्षापासून पतीपासून विभक्त राहत होती. हत्येच्या उद्देशाने पतीने सलोखाच्या बहाण्याने तिला घेऊन गेले. आधी त्या दोघांनी मद्यपान केले आणि त्यानंतर त्यांनी त्यांचे डोके फोडले आणि पत्नीला ठार मारले. रेश्मा आपले फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करायची. त्यामुळे तिचे फॉलोअर्स वाढले होते. या रागातच पतीने पत्नीची हत्या केली.

वाचा-शिवाजी महाराजांच्या चेहऱ्यावर मोदींचा फोटो, सोशल मीडियावर चर्चा

ओळख लपविण्यासाठी चिरडलं डोकं

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेची हत्या केल्यानंतर तिची ओळख लपवण्याच्या उद्देशाने डोक्याला दगडाने ठेचले होते. जयसिंगपूर खोर, नैना उर्फ रेश्मा मंगलानी असे मृत महिलेचे नाव आहे. पोलिसांनी कुटुंबातील सदस्यांची विचारपूस केली असता कुटुंबीयांनी महिलेच्या पतीबद्दल शंका व्यक्त केली. दोन वर्षांपूर्वी या दोघांचे गाझियाबाद येथे जाऊन आर्य समाजात लग्न झाले. नंतर फैयाजच्या सांगण्यावरून रेश्माने मुस्लीम पद्धतीनेही विवाह केला.

First published: January 21, 2020, 12:06 PM IST
Tags: crime

ताज्या बातम्या