Audi Q7 कारची तरुणाला भीषण धडक, 30 फूट दूर छतावर कोसळला तरुण

Audi Q7 कारची तरुणाला भीषण धडक, 30 फूट दूर छतावर कोसळला तरुण

कार दोन तरुणी चालवत होत्या. अचानक कारवरचं नियंत्रण सुटलं आणि घात झाला.

  • Share this:

जयपूर, 06 नोव्हेंबर : कॉन्स्टेबलच्या भर्तीसाठी निघालेला तरुण परीक्षेला न पोहोचता थेट रुग्णालयात पोहोचल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली. कॉन्स्टेबलच्या भर्तीसाठी रस्त्यानं जात असलेल्या तरुणाला ऑडी क्यू 7 या भरधाव गाडीनं जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की गाडीचं तर नुकसान झालंच पण तरुण रस्त्यावरून उंच उडून खाली असलेल्या घराच्या छतावर कोसळला आहे.

ऑडी क्यू 7 कारच्या धडकेमध्ये तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातात तरुणाचा एक पाय कापला गेल्याची देखील माहिती मिळाली आहे. राजस्थानमधील जयपूरच्या सोडाळा इथे हा भीषण अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे.

हे वाचा-धूर आला मग आग भडकली अन् क्षणात झाला विस्फोट, बर्निंग कारचा VIDEO

अपघाताची माहिती मिळताच तातडीनं पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यामध्ये कारचं देखील थोडं नुकसान झालं आहे. मिळालेल्या माहितीनुसार तरुण कॉन्स्टेबलच्या भर्ती परीक्षा प्रक्रियेसाठी निघाला होता. त्याचवेळी रस्त्यावरून जात असताना मागून येणाऱ्या भरधाव लक्झरी कारने ऑडी क्यू 7 ने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भयंकर होती की तरुण हवेत उंच उडाला आणि रस्त्यापासून 30 फूट अंतरावर असलेल्या घराच्या छतावर आदळला. त्याचा पाय कापला गेला या तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही कार तरुणी चालवत होत्या. कारवरचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाल्याचं प्राथमिक तपासात पुढे आलं आहे. या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही तरुणींना ताब्यात घेतलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही धडक इतकी भीषण होती की उड्डाणपुलाचे रेलिंग निखळले इतकच नाही तर दोन वीजेचे खांबही कोसळले आहेत. कार चालवणारी युवती जयपूरमधील प्रतिष्ठित रुग्णालयाचा मालकाची सून असल्याची माहिती मिळालाी आहे. जयपूरहून अजमेरला जात असताना ही घटना घडल्याची माहिती मिळाली आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: November 6, 2020, 1:19 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading