जयपूर, 13 मे: सत्तापटाल झाला की नवं सरकार जुन्या सरकारने घेतलेले अनेक निर्णय बदलते. अशाच एक प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे. राजस्थानमधील सत्ताधारी काँग्रेसने भाजप सरकारचा निर्णय बदलला आहे. हा निर्णय वीर सावरकर यांच्यासंदर्भातील आहे.
राज्यातील 10वीच्या विद्यार्थ्यांच्या पाठ्यपुस्तकात स्वातंत्र्यवीर विनायक सावरकर यांचा उल्लेख देशभक्त असा होता. पण पुढे पुस्तकात सावरकरांचा उल्लेख देशभक्त उल्लेख असणार नाही. तर त्यांनी तुरुंगातून सुटण्यासाठी इंग्रजांकडे दया याचिका केली होती, असा उल्लेख केला जाणार आहे.
३ वर्षापूर्वी राज्यातील वसुंधरा राजे सरकारने सावरकरांच्या संदर्भातील एक धडा पुस्तकात घेतला होता. यात सावरकरांना महान देशभक्त आणि क्रांतिकारी म्हटले होते. पण आता काँग्रेस सरकारने नव्याने अभ्यासक्रम तयार केला आहे. यात सावरकरांना देशभक्त न म्हणता तुरुंगातून सुटण्यासाठी त्यांनी ब्रिटिश सरकारकडे दया मागितली होती, असे म्हटले जाणार आहे.
अशोक गहलोत सरकारच्या या निर्णयावर भाजपने जोरदार टीका केली आहे. राज्य सरकारचा हा निर्णय म्हणजे सावरकरांचा अपमान असल्याचे भाजपने म्हटले आहे.
मुलीसोबत रस्ता ओलांडणाऱ्या महिलेला कारने उडवलं, काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO