लष्कर च्या दहशतवाद्याची कारागृहात हत्या, टीव्हीच्या आवाजावरून भांडण

लष्कर च्या दहशतवाद्याची कारागृहात हत्या, टीव्हीच्या आवाजावरून भांडण

या दहशतवाद्यासोबत इतर आठ दहशतवादी या जेलमध्ये अटकेत आहेत. दहशतवादाच्या आरोपाखाली न्यायालयाने त्या सर्वांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.

  • Share this:

जयपूर 20 फेब्रुवारी : पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानविरुद्ध देशभर रोष असताना अटकेत असलेल्या एका पाकिस्तानी दहशतवाद्याच्या हत्येची बातमी समोर आलीय. राजस्थानची राजधानी जयपूरच्या मध्यवर्ती जेलमध्ये अटकेत असलेल्या एका दहशतवाद्याची बुधवारी हत्या झाली. कैद्यांच्या भांडणात इतर कैद्यांनी या दहशतवाद्याला ठार केलं अशी माहिती सूत्रांनी दिली.

शकरउल्ला असं लष्करे ए तोयबाच्या या दहशतवाद्याचं नाव आहे. त्याच्यासोबत इतर आठ दहशतवादी या जेलमध्ये अटकेत आहेत. दहशतवादाच्या आरोपाखाली न्यायालयाने त्या सर्वांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. 2010मध्ये एटीएसने या सर्वांना अटक केली होती. दहशतवादी घटनांसाठी पैसे जमा करणं, नव्या तरुणांची भरती करणं असे आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले आहेत.

शकरउल्ला सोबत असगर अली, मोहम्मद इकबाल, हाफिज़ अब्दुल मज़ीद, काबिल खां आणि अरुण जैन यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. या घटनेनंतर स्थानिक पोलीस आणि जेल प्रशासनाचे महत्त्वाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलीस घटनेची चौकशी करत आहेत.

VIDEO : 'तुला पाहते रे'; रियल लाईफमधली इशा हेलिकॉप्टरमध्ये बसून गेली सासरी

First published: February 20, 2019, 4:58 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading