महिला पोलिसावर जडला जीव, बोलण्यास नकार दिला म्हणून कॉन्स्टेबलने स्वत: पेटवलं

महिला पोलिसावर जडला जीव, बोलण्यास नकार दिला म्हणून कॉन्स्टेबलने स्वत: पेटवलं

कॉन्स्टेबल दौलत सिंहला एका महिला सह-पोलीस अधिकाऱ्याशी एकतर्फी प्रेम झालं होतं.

  • Share this:

राजस्थान, 14 मे : प्रेमातून हत्या किंवा आत्महत्या होण्याचे प्रकार वाढले आहेत. एकतर्फी प्रेमातून एका पोलीस कॉन्स्टेबलने  स्वत:ला रॉकेलने पेटवून देत आत्महत्या करण्याचा प्रयत्न करण्याता आला होता. यामध्ये 60 टक्के भाजल्यामुळे कॉन्स्टेबलचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. राजस्थानच्या सीकरमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कॉन्स्टेबल दौलत सिंहला एका महिला सह-पोलीस अधिकाऱ्याशी एकतर्फी प्रेम झालं होतं. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी दौलत सिंहने स्वत:च्या बाईकमधलं पेट्रोल काढत जाळून घेतलं.

सगळ्यात धक्कादायक म्हणजे दौलतने आधी स्वत:वर पेट्रोल ओतून घेतलं. त्यानंतर तो महिला अधिकाऱ्याशी बोलण्यासाठी गेला. पण महिला अधिकाऱ्याने बोलण्यासाठी नकार दिला. त्यानंतर त्याने स्वत: पेटवून घेतलं.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 20 वर्षांचा दौलत हा आधीच विवाहीत होता आणि तो पोलीस स्थानकात काम करत असलेल्या महिला सह-पोलीस अधिकाऱ्याच्या एकतर्फी प्रेमात पडला. 8 मे रोजी आत्महत्या करण्याआधी त्याने महिला अधिकाऱ्याला 16 वेळा फोन केला होता. दौलतच्या अशा वागण्यामुळे महिला अधिकारी आणि दौलतची वेगवेगळ्या पोलीस स्थानका बदली करण्यात आली होती अशीही माहिती पोलिसांनी दिली.

मृत पोलीस कॉन्स्टेबल दौलतच्या पत्नीने काही महिन्यांआधी अत्याचार करत असल्याची तक्रार पोलीस स्थानका केली होती. दरम्यान, या प्रकरणात आता पोलीस अधिक तपास करत आहेत.

पगार मागितला म्हणून तरुणीला लाठ्या-काठ्याने बेदम मारहाण, VIDEO व्हायरल

First published: May 14, 2019, 2:53 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading