'राहुल गांधींच्या राजीनाम्यातील ती चार पानं काँग्रेसला मजबूत करतील'

Rahul Gandhi यांनी Congress अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर अशोक गेहलोत यांनी त्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 6, 2019 11:52 AM IST

'राहुल गांधींच्या राजीनाम्यातील ती चार पानं काँग्रेसला मजबूत करतील'

जयपूर, 06 जुलै : लोकसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारत राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. राहुल गांधी यांनी जबाबदारीवर कायम राहावं यासाठी काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांच्या मनधरणाची प्रयत्न देखील केला. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी देखील राहुल गांधी यांची भेट घेत त्यांना निर्णयापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. पण, राहुल गांधी आपल्या निर्णयावर ठाम राहिले. त्यानंतर आता राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी काँग्रेस नेत्यांना, कार्यकर्त्यांना राहुल गांधी यांच्या राजीनाम्यातील चार पानं वाचा. त्या चार पानांमध्ये अनेक गोष्टी लपलेल्या आहेत. ती चार पानं दस्तऐवज बनली असून आगामी काळात काँग्रेसला मजबूत करण्यासाठी महत्त्वाची असणार असल्याचं गेहलोत यांनी म्हटलं आहे. राहुल गांधी यांनी राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसनं अद्याप देखील अध्यक्षपदी कुणाचीही नेमणूक केलेली नाही. प्रियांका गांधी यांनी राहुल गांधी यांच्या निर्णयावर धाडस लागतं अशी प्रतिक्रिया दिला होती.

UPSC पास न होता देखील केंद्रात सरकारी अधिकारी होता येणार

कोण होणार काँग्रेसचा अध्यक्ष?

काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी अशोक गेहलोत यांचं नाव आघाडीवर होतं. पण, सुशिलकुमार शिंदे यांनी बाजी मारल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. सुशिलकुमार शिंदे हे गांधी घराण्याच्या जवळचे आहेत. शिवाय, राज्यातील आगामी निवडणुकांचा विचार करता दलित मतं मिळवण्यासाठी देखील काँग्रेसला त्याचा फायदा होणार आहे. पण, अद्याप याप्रकरणी कोणताही निर्णय झालेला नाही. राहुल गांधी यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांनी राजीनाम्यातील चार पानं ट्विट केली होती. शिवाय, ट्विटरवर काँग्रेस अध्यक्षपद असल्याचा उल्लेख देखील काढला होत. सध्या अध्यक्षपदासाठी काँग्रेसमध्ये अनेक नावांची चर्चा होताना दिसत असली तरी त्यावर कोणताही निर्णय झालेला नाही.

जीव धोक्यात घालून तरुणाची बाईकवर स्टंटबाजी; हायवेवरील VIDEO व्हायरल

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 6, 2019 11:52 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...