Home /News /national /

अशोक गहलोतांची चालली 'जादू', असा फसला सचिन पायलट यांचा डाव

अशोक गहलोतांची चालली 'जादू', असा फसला सचिन पायलट यांचा डाव

सचिन पायलट यांनी दिल्ली गाठल्यानंतर राजस्थानच्या राजकारणात रविवारची रात्र अत्यंत निर्णायक ठरली. गहलोत यांनी रात्रीतूनच सर्व सूत्र हलवली.

    जयपूर, 13 जुलै :  राजस्थानमध्ये मध्य प्रदेशसारखीच परिस्थिती निर्माण झाली होती. बहुमतात असूनही गहलोत सरकार कोसळण्याची शक्यता निर्माण झाली होती.  पण राजस्थानच्या राजकारणातले जादुगार अर्थात अशोक गहलोत यांनी आपला करिश्मा दाखवत सरकार स्थिर केले आहे. उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी टाकलेला डाव उलथवून टाकला आहे. राजस्थानमध्ये भाजपच्या वसंधुरा राजे सरकारचा पाडवा करत काँग्रेस बहुमताने सत्तेत आली. त्यानंतर अनुभवी आणि गांधी घराण्याशी जवळ असलेले अशोक गहलोत यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ पडली. त्यावेळीही मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत असलेले सचिन पायलट कमालीचे नाराज झाले होते. त्यामुळे खुद्द राहुल गांधी यांना मध्यस्थी करावी लागली होती. त्यामुळे पायलट यांना उपमुख्यमंत्री देण्यात आले होते. पण, दोन्ही नेत्यांमध्ये वाद चांगलाच पेटला होता. अखेर दोन दिवसांपूर्वी सचिन पायलट यांनी 30 समर्थक आमदारांना घेऊन बंडाचे निशाण फडकवले. आज सचिन पायलट हे जवळपास भाजपवासी होणार हे निश्चितही झाले होते. सचिन पायलट यांचे बंड झाले थंड, राहुल गांधींनी दिला खास निरोप पण, अशोक गहलोत एवढ्यात हार मानतील, असेही नव्हते. गहलोत यांनी तातडीने सर्व समर्थक आमदारांची आपल्या निवासस्थानी बैठक बोलावली. घोडेबाजार होऊ नये म्हणून सर्व आमदारांना ताब्यात घेतले. एकूण 105 आमदार गहलोत यांनी आपल्या बाजूने उभे केले. राजस्थान विधानसभेत 200 सदस्यांची जागा आहे. त्यामुळे गहलोत यांनी बहुमताला लागेल एवढी संख्या गोळा करून दाखवली. सचिन पायलट यांनी दिल्ली गाठल्यामुळे रविवारी रात्री उशिरापर्यंत राजस्थानमध्ये सरकारवर वाचवण्याची मोहिम सुरू झाली. काँग्रेस प्रदेश प्रभारी अविनाश पांडे, वरिष्ठ नेता रणदीप सुरजेवाला आणि अजय माकन हे जयपूरमध्ये दाखल झाले. या टीमने सर्व मंत्री आणि आमदारांची व्यक्तिगत चर्चा केली. रविवारी पहाटेपर्यंत सर्व आमदारांशी चर्चा करण्याचे काम सुरू होते. अशोक गहलोत, अविनाश पांडे,  रणदीप सुरजेवाला आणि अजय माकन यांनी योग्य ती रणनिती आखली. आणि आज सोमवारी सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास पक्षाची बैठक बोलावली. पण, ही बैठक वेळेवर काही झाली नाही. ही बैठक होण्यासाठी दुपारचा एक वाजला. klमुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर मारुती सुझुकीची कार रेलिंग तोडून उलटली VIDEO या बैठकीत गहलोत यांनी आपल्याकडे सरकार वाचवण्यासाठी पूर्ण बहुमताचा आकडा असल्याचा दावा केला. या बैठकीला 102 ते 105 आमदार हजर असल्यामुळे साहजिक बहुमताचा आकडा असल्याचं सिद्ध झालं. त्यामुळे तिन्ही नेत्यांनी विजयी खुण दाखवत  सरकार स्थिर असल्याचा दावा केला. दुसरीकडे दिल्लीत ठाण मांडून बसलेले सचिन पायलट हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेणार होते. पण, त्याआधीच गहलोत यांनी बहुमताचा आकडा असल्याचं दाखवून दिल्यामुळे पायलट यांची गोंची झाली. सचिन पायलट यांनी आपण भाजपमध्ये जाणार नाही, असं जाहीरच करून टाकलं. त्यामुळे पायलट यांनी बंड पुकारले होते, खरे पण गहलोत यांनी शक्तिप्रदर्शन केल्यामुळे त्यांचे बंड मोडीत निघाले. राहुल गांधींचा सचिन पायलट यांना निरोप राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि  उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यातील वादावर काँग्रेसच्या कार्यकरिणीची बैठक पार पडली. या बैठकीत काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी दोन्ही नेत्यांशी संवाद साधला. Google कडून भारतासाठी आली आनंदाची बातमी! Digital India साठी 10 अब्ज डॉलर्स राहुल गांधी यांनी रणदीप सुरजेवाला यांच्या फोनवरुन अशोक गहलोत यांची चर्चा केली. तसंच दुसरीकडे सचिन पायलट हे सकाळपासून राहुल गांधी यांच्या संपर्कात होते.  सचिन पायलट यांनी कोणताही मोठा निर्णय घेऊ नये, त्यांनी परत यावे, त्यांना सन्मानाने पक्षात स्थान दिले जाईल, असा निरोप देण्यात आला आहे. तर प्रियांका गांधी यांनीही  मध्यस्थी करून दोन्ही नेत्यांशी संवाद साधला. त्यामुळे आता सचिन पायलट काय निर्णय घेता याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या