तरुण सागर महाराज यांचं महानिर्वाण; पंतप्रधानांनी व्यक्त केल्या शोक संवेदना

शनिवारी पहाटे 3.18 वाजता नवी दिल्लीत महानिर्वाण झालं. कृष्णा नगर येथील राधापुरी जैन मंदिरात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 51 वर्षांचे होते.

News18 Lokmat | Updated On: Sep 1, 2018 05:09 PM IST

तरुण सागर महाराज यांचं महानिर्वाण; पंतप्रधानांनी व्यक्त केल्या शोक संवेदना

नवी दिल्ली, 1 सप्टेबर : जैन मुनी तरुण सागर यांचं शनिवारी पहाटे 3.18 वाजता नवी दिल्लीत महानिर्वाण झालं. कृष्णा नगर येथील राधापुरी जैन मंदिरात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 51 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती गंभीर होती. प्रकृतीत सुधारणाच होत नसल्यामुळे त्यांनी उपचार थांबवून चातुर्मास स्थळी संथारा घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार शनिवारी दुपारी ३ वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अनेक कुप्रथांवर परखड शब्दांमध्ये प्रहार करणारे मुनी अशी तरुण सागर यांची ओळख होती. त्यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून शोक संवेदना व्यक्त केल्या.

गेल्या २० दिवसांपूर्वी त्यांना काविळ झाला होता. उपचारांसाठी त्यांना मॅक्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्या प्रकृतीसाठी देशभरातून प्रार्थनाही सुरू होत्या. मात्र, शनिवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. प्रकृतीत सुधारणाच होत नसल्यामुळे तरुण सागर यांनी उपचार थांबवून चातुर्मास स्थळी त्यांना संथारा घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार शनिवारी दुपारी ३ वाजता त्यांना संथारा देण्यात आला. संथारा म्हणजे जैन धर्मानुसार मृत्यू समीप पाहून अन्न-पाण्याचा त्याग करणं.

पूर्व दिल्लीतील कृष्णा नगर येथील राधापुरी जैन मंदिरात तरुण सागर यांनी अखेरचा श्वास घेतला. अतिशय कडव्या विचारांसाठी ओळखल्या जाणाऱ्या तरुण सागर यांच्या अनुयायांची संख्या खूप मोठी आहे. त्यामुळेच तरुण सागर यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समजताच त्यांच्या लाखो अनुयायांकडून प्रार्थना केल्या जात होत्या. मात्र त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. तरुण सागर यांच्यावर शनिवारी दुपारी तीन वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले, म्हणजेच संथारा देण्यात आला.

जैन मुनी तरुण सागर यांचं निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विटरच्या माध्यमातून शोक संवेदना व्यक्त केल्यात. मुनी तरुण सागर महाराज यांनी त्यांचं संपूर्ण आयुष्य समाजाच्या उन्नतीसाठी समर्पित केले. ते नेहमीच माझ्या स्मरणात राहतील. त्थोयांचे थोर विचार लोकांना कायम प्रेरणा देत राहतील. त्यांच्या अकाली निधनाने अत्यंत दु:ख झाले असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे. तर राहुल गांधी यांनीही शोक व्यक्त केलाय.

 

Loading...

पुरोगामी विचारांचे मुनी म्हणून ओळख

- मूळ नाव - पवन कुमार जैन

- जम्न दिवस - 26 जून 1967

- जन्मठिकाण - दामोह, मध्य प्रदेश

- आईचं नाव शांतीबाई आणि वडिलांचं नाव प्रताप चंद्र

- वयाच्या 13 व्या वर्षी केला होता गृहत्याग

- नंतर छत्तीसगडमध्ये दीक्षा घेतली.

- दिगंबर पंथाचे मुनी

- पुरोगामी विचारांचे मुनी म्हणून ओळख

- 2007 मध्ये कोल्हापूर दौऱ्यादरम्यान प्रकृती बिघडली

- पण आजन्म जैन मुनीच राहण्याचा निर्धार

- व्याख्यानं 'कडवे प्रवचन' म्हणून प्रसिद्ध

- निषिद्ध किंवा वादग्रस्त विषयांवर बोलण्यास कचरले नाहीत

- भक्तांमध्ये बिगर जैनांचाही संख्या मोठी

- तरुण सागर यांनी मध्य प्रदेश आणि हरियाणा विधानसभेतही प्रवचन दिलं होतं. हरियाणा विधानसभेतील प्रवचनावरुन मोठा वाद निर्माण झाला होता.

- मध्य प्रदेश सरकारने 6 फेब्रुवारी 2002 रोजी त्यांना राजकीय अतिथीचा दर्जाही दिला होता.

'सनातनवर बंदी घातलीच पाहिजे'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 1, 2018 04:20 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...