'जय श्रीराम' म्हटलं म्हणून शिक्षिकेने मुलाला दिला मार

'जय श्रीराम' म्हटलं म्हणून शिक्षिकेने मुलाला दिला मार

पश्चिम बंगालच्या हावडा जिल्ह्यात 'जय श्रीराम' च्या घोषणेवरून घडलेलं एक गंभीर प्रकरण समोर आलं आहे. पहिलीच्या वर्गातल्या एका लहानग्याने जय श्रीरामच्या घोषणा दिल्या म्हणून शिक्षिकेने त्याला चांगलाच मार दिला.

  • Share this:

कोलकाता, 11 जुलै : लोकसभा निवडणुकीत 'जय श्रीराम'च्या घोषणेवरून बरंच राजकारण झालं. पश्चिम बंगालमध्ये हा मुद्दा चांगलाच पेटला होता. तिथे धार्मिक कारणांवरून हिंसाचार भडकला होता. आता पश्चिम बंगालच्याच हावडा जिल्ह्यात 'जय श्रीराम' च्या घोषणेवरून घडलेलं एक गंभीर प्रकरण समोर आलं आहे. पहिलीच्या वर्गातल्या एका लहानग्याने जय श्रीरामच्या घोषणा दिल्या म्हणून शिक्षिकेने त्याला चांगलाच मार दिला.

हा लहानगा अजून धर्म, जातीपाती याबदद्ल काहीच जाणत नाही. त्याला जय श्रीराम चा अर्थही माहीत नाही. असं असताना त्याला मार देण्याचं कारणच काय, असा सवाल या मुलाचे वडील आर्यन सिंह यांनी केला आहे.

पार्थ पवारांच्या ड्रायव्हरचे मुंबईतील कुलाब्यातून अपहरण

हावडा जिल्ह्यातल्या रामकृष्ण विद्यालयामध्ये ही घटना घडली. या मुलाला मार बसल्याने तो अजूनही या धक्क्यातून सावरलेला नाही, असं त्याच्या वडिलांनी सांगितलं. आपल्याला मार तरी का बसला हेही त्याला कळत नाहीये. त्यामुळे त्याची समजूत घालणंही आपल्यासाठी कठीण होऊन बसलं आहे, असं ते म्हणाले.

रामकृष्ण विद्यालयातले काही विद्यार्थी 'जय श्रीराम' च्या घोषणा देत होते. आपल्या मित्रांचं बघून हा मुलगाही घोषणा देऊ लागला. पण या सगळ्यांना शिक्षा दिली गेली नाही. फक्त आपल्याच मुलाला मार बसला, असं आर्यन सिंह यांचं म्हणणं आहे.

'मला घरी येऊन अटक करा,' पत्नीचा खून करून पोलिसांना केला फोन

'जय श्रीराम' च्या घोषणांचं राजकारण आता लोकसभा निवडणुकीतून शाळेतही पोहोचल्यामुळे ही बाब गंभीर बनली आहे.पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी याबद्दल नुकताच एक ब्लॉग लिहिला आहे. भाजपचे कार्यकर्ते या मुद्द्यावरून धार्मिक तेढ वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप त्यांनी केला.

दरम्यान, 'जय श्रीराम' लिहिलेली 10 लाख पोस्टकार्ड ममता बॅनर्जींना पाठवण्यात येथील, असं भाजपने जाहीर केलं आहे. भाजप आणि तृणमूल काँग्रेसच्या या राजकारणात निरपराध मुलं मात्र पोळून निघत आहेत हेच या प्रकरणावरून दिसतं आहे.

======================================================================================

VIDEO: मनपाच्या भोंगळ कारभाराचा बळी, खेळताना चिमुकला मॅनहोलमध्ये पडला

First published: July 11, 2019, 6:44 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading