• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • राज्यपालांच्या अभिभाषणातून ‘जय हिंद’ वगळल्याचा अभिमान, मित्रपक्षांनी थोपटली सत्ताधारी द्रमुकची पाठ, विरोधक आक्रमक

राज्यपालांच्या अभिभाषणातून ‘जय हिंद’ वगळल्याचा अभिमान, मित्रपक्षांनी थोपटली सत्ताधारी द्रमुकची पाठ, विरोधक आक्रमक

तमिळनाडूच्या राज्यकारभारातून ‘जय हिंद’ हे शब्द वगळल्याबद्दल सार्थ अभिमान वाटत असून आपली मान अभिमानानं उंचावल्याचं केडीएमकेनं म्हटल्यामुळं वादाला तोंड फुटलंय.

 • Share this:
  चेन्नई, 29 जून : तमिळनाडूतील (Tamil Nadu) द्रमुक (DMK) सरकारच्या पहिल्या अधिवेशनाच्या (Session) पहिल्या दिवशी राज्यपालांच्या अभिभाषणानंतर (Governor's address) होणारी ‘जय हिंद’ची घोषणा (Jai Hind) यावर्षी रद्द करण्यात आली. राज्यपालांच्या भाषणाच्या शेवटीचा ‘जय हिंद’ हा उल्लेखही वगळण्यात आला. त्याबद्दल सत्ताधारी द्रमुकचं मित्रपक्ष केडीएमकेनं (KDMK) जाहीर अभिनंदन केलंय. तमिळनाडूच्या राज्यकारभारातून ‘जय हिंद’ हे शब्द वगळल्याबद्दल सार्थ अभिमान वाटत असून आपली मान अभिमानानं उंचावल्याचं केडीएमकेनं म्हटल्यामुळं वादाला तोंड फुटलंय. काय आहे वाद? ‘जय हिंद’ या घोषणेतील हिंद शब्दाला तमिळनाडूतील सत्ताधारी द्रमुक आणि मित्रपक्षांचा गेल्या अनेक वर्षांपासून विरोध आहे. हिंद हा शब्द केवळ हिंदी भाषेचं प्रतिनिधित्व करणारा असून आपण केवळ एकाच भाषेचं वर्चस्व मान्य करायला तयार नाही, अशी भूमिका द्रमुकनं घेतली आहे. तमिळनाडूमध्ये तमिळ आणि इंग्रजी भाषेत काम चालत असल्यामुळे ‘जय हिंद’ ही घोषणाच गैरलागू असल्याचा युक्तीवाद केडीएमकेनं केला आहे. परंपरेत खंड दरवर्षी अधिवेशनात राज्यपालांच्या अभिभाषणाच्या शेवटी राज्यपाल ‘जय हिंद’ अशी घोषणा देतात. त्यानंतर सभागृहातील सदस्यदेखील ‘जय हिंद’च्या घोषणा देतात. अर्थात, राज्यपालांचे अभिभाषण राज्य सरकारकडूनच तयार करण्यात येते. यावर्षी राज्यपालांच्या भाषणाच्या शेवटी ‘जय हिंद’ ही घोषणा लिहिण्यात आली नव्हती. त्यामुळे ना राज्यपालांनी ही घोषणा केली, ना सदस्यांनी घोषणा दिल्या. तमिळनाडूच्या इतिहासात हा महत्त्वाचा दिवस असून एका भाषेचं वर्चस्व झुगारून देऊन स्थानिक वापरत असणाऱ्या भाषांचा सन्मान केल्याची भूमिका सत्ताधाऱ्यांनी घेतली आहे. हे वाचा -बीडमधील इरफानला धर्मांतर प्रकरणात अटक; वाचा काय कोडवर्ड आणि बीड कनेक्शन भाजप आक्रमक द्रमुकचा हा निर्णय म्हणजे देशाचा अपमान असल्याचं भाजपनं म्हटलं आहे. आपण सभागृहात जाहीररित्या ‘जय हिंद’ आणि वंदे मातरमच्या घोषणा देणार असल्याची भूमिका भाजपनं घेतलीय. तमिळनाडूमधील डीएमके सरकारची ही कृती म्हणजे एक प्रकारे फुटिरतावादाला आमंत्रण असल्याची टीका समाजमाध्यमातून होत आहे. तमिळनाडू सरकार भाषेच्या नावाखाली फुटिरतेची बीजं रोवत असल्याची टीका विरोधी पक्षांनी केली असून आपण सभागृहात आणि जागोजागी देशप्रमाची साक्ष असणाऱ्या वंदे मातरम आणि ‘जय हिंद’च्या घोषणा देत राहणार असल्याचं विरोधकांनी म्हटलं आहे.
  Published by:desk news
  First published: