Jagannath Puri Rath Yatra 2020: रथयात्रेला परवानगी मिळणार? 16 याचिकांवर सर्वोच्च न्यायालय करणार विचार

Jagannath Puri Rath Yatra 2020: रथयात्रेला परवानगी मिळणार? 16 याचिकांवर सर्वोच्च न्यायालय करणार विचार

जगन्नाथ रथ यात्रा ही ओडिशाची जगप्रसिद्ध यात्रा असून यावर्षी 23 जून मंगळवारी सुरू होणार होती.

  • Share this:

नवी दिल्ली, 22 जून : यंदाच्या भगवान जगन्नाथांच्या रथ यात्रेवर (Jagannath Puri Rath Yatra) वर सर्वोच्च न्यायालयाकडून बंदी घालण्यात आली आहे. या निर्णयामध्ये दुरुस्तीसाठी दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालय विचार करेल. यात्रा काढण्यावरून 16 याचिका दाखल करण्यात आल्या होत्या ज्याच्यावर न्यायाधीश एस. रवींद्र भट विचार करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. खरंतर, जगन्नाथ रथ यात्रा ही ओडिशाची जगप्रसिद्ध यात्रा असून यावर्षी 23 जून मंगळवारी सुरू होणार होती. परंतु सर्वोच्च न्यायालयानं या यात्रेवर बंदी घातली आहे. कोरोना संक्रमणाचा धोका लक्षात घेता कोर्टाने भाविकांना गर्दी न करण्याचं आवाहन केलं आहे. एकाच ठिकाणी जमण्याची परवानगी दिली नाही.

काय म्हटलं आहे याचिंकामध्ये?

सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकांमध्ये जगन्नाथ रथयात्रा ही शतकांपासूनची जुनी परंपरा आहे. ज्यामध्ये कोट्यावधी भाविकांचा विश्वास दडलेला आहे. या यात्रेला फक्त पुरीमध्येच काढण्याची परवानगी द्यावी. केवळ पुरीच्या मुख्य रथयात्रेला परवानगी देण्यात यावी अशी मागणी या याचिकांमधून करण्यात आली आहे.

महाराष्ट्र सरकारने चीन कंपन्यांना दिला धक्का, 5 हजार कोटींचा प्रकल्प थांबवला

माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार, लाखोंऐवजी 500 ते 600 लोकांनाच यात्रा काढण्यासाठी आणि पूजा करण्यासाठी परवानगी द्यावी अशी विनंती न्यायालयाकडे करण्यात आली आहे. यावेळी कोरोनाशी संबंधित सर्व मार्गदर्शक तत्त्वं आणि सामाजिक अंतरांचं पालन केलं जाईल असंही याचिकेत म्हटलं आहे.

पिपंरी चिंचवड हादरलं! दोन दिवस मित्राला डिझेलनं झाळलं, तुकडे करून फेकलं नदीत

भाजप नेते पात्रा यांनीही केला अर्ज दाखल

पुरी जगन्नाथ यात्रेसंबंधी भाजप नेते पात्रा यांनीही सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. भगवान जगन्नाथाच्या 800 सेवेच्या माध्यमातून भाविकांच्या मंडळांशिवाय रथयात्रा नेण्यास परवानगी द्यावी असं त्यांनी याचिकेमध्ये लिहिलं आहे. यावर आता सर्वोच्च न्यायालय काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं आहे.

भाजपमध्ये डॅमेज कंट्रोल सुरू, येत्या 15 दिवसांत या नावांना मिळणार मोठी जबाबदारी

>संपादन - रेणुका धायबर

First published: June 22, 2020, 1:28 PM IST
Tags:

ताज्या बातम्या