मध्य प्रदेशमध्ये बसला अपघात, 3 जण ठार; सर्व प्रवासी महाराष्ट्रातील?

मध्य प्रदेशमध्ये बसला अपघात, 3 जण ठार; सर्व प्रवासी महाराष्ट्रातील?

अलाहाबादमधून नागपूरलाकडे येणाऱ्या बसला जबलपूर येथे अपघात झाला. या अपघातात 7 जण ठार झाले आहेत.

  • Share this:

जबलपूर, 17 फेब्रुवारी: अलाहाबादमधून नागपूरकडे येणाऱ्या बसला मध्य प्रदेशमधील जबलपूर येथे अपघात झाला. या अपघातात 3 जण ठार तर अन्य 30 जण जखमी झाले आहेत. सर्व जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बसमधील अधिकतर प्रवासी महाराष्ट्रातील असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

प्राथमिक वृत्तानुसार बसमधील सर्व प्रवासी कुंभ मेळ्याहून परत येत होते. शनिवारी रात्री साडे तीनच्या सुमारास हा अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस करोंदा येथील एका पुलावरुन नाल्यात पडली. बसमधील तिघांचा मृत्यू झाला. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु असून त्यातील काहींची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.

मध्यरात्री झालेल्या या अपघातामुळे एकच गोंधळ उडाला. अपघाताचे वृत्त कळताच पोलिस आणि स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. बस क्रेनच्या मदतीने बाहेर काढण्यात आली आहे. दरम्यान, अलाहाबाद ते नागपूर या लांब मार्गावर एकच चालक बस चालवत होता. त्यामुळे हा अपघात झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

बसमधील प्रवाशांबद्दल अधिक माहिती मिळाली नाही. पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अधिकतर प्रवासी महाराष्ट्रातील असण्याची शक्यता आहे.

VIDEO : काळजाचं पाणी झालं, जेव्हा वीरपत्नीने बहाद्दुर पतीला केला 'अखेरचा सलाम'

First published: February 17, 2019, 1:15 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading