• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • पैलवान पतीने चाकू दाखवून पत्नीवर केले लैंगिक अत्याचार, वैतागून त्याच चाकूने तिने चिरला गळा

पैलवान पतीने चाकू दाखवून पत्नीवर केले लैंगिक अत्याचार, वैतागून त्याच चाकूने तिने चिरला गळा

हत्येच्या रात्रीदेखील कालूने चाकूचा धाक दाखवत तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. याच जबरदस्तीत चाकू हिनाच्या हाती आला आणि त्यावेळी तिने क्षणाचाही विचार न करता त्याच्यावर चाकूने सपासप वार केले.

 • Share this:
  मध्य प्रदेश, 18 ऑक्टोबर : मध्य प्रदेशच्या जबलपूरमध्ये 10 ऑक्टोबरला कालू पैलवानाच्या नावाने प्रसिद्ध असलेल्या इनाम उर रहमानच्या हत्याकांडाचा सनसनाटी खुलासा पोलिसांनी केला आहे. या प्रकरणात रहमानच्या अत्याचाराला कंटाळून त्याच्या पत्नीने त्याची निर्घृण हत्या केली आहे. हिना असं या महिलेचं नाव आहे. समाजसेवेचं ढोंग करणाऱ्या रहमानचे कारनामे ऐकूनही दंग व्हायला होतं. त्याने हिनावर इतके गंभीर अत्याचार केले की तिने टोकाचं पाऊल उचलत त्याची हत्याच केली. मृत कालू पैलवान हा एका समाजसेवी संस्थेचा अध्यक्ष होता. कालू गोहलपूर परिसरात त्याच्या कुटुंबियांसोबत राहत होता. 10 ऑक्टोबरला सकाळच्या सुमारास त्याचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात त्याच्या बेडरुममध्ये पडलेला सापडला. तर हत्येच्या रात्री कालूला भेटण्यासाठी कोणी लोक येणार होते, त्यामुळे त्याने त्याच्या पत्नीला छतावरील खोलीमध्ये पाठवलं असल्याचं कुटुंबियांनी सांगितलं आहे. या हत्येत पोलिसांनी कसून तपास केला आणि त्यानंतर एक धक्कादायक माहिती समोर आली. पोलीस चौकशीत हिनाने प्रत्येक वेळी तिचा जबाब बदलला. याचाच संशय पोलिसांना आला आणि त्यांनी हिनाची सक्तीने चौकशी केली असता तिने सारं सत्य ओकलं. स्वत:ला समाजसेवक बोलणारा कालू हा माझ्यावर रोज अत्याचार करायचा. शरीरसंबंधांसाठी तो मला नेहमी जबरदस्ती करायचा. मी विरोध केला तर तो मला मारहाण करायचा आणि म्हणून त्याला वैतागून मी त्याची हत्या केल्याचं हिनाने सांगितलं. एएसपी राजेश त्रिपाठी यांनी सांगितलं की, हत्येच्या रात्रीदेखील कालूने चाकूचा धाक दाखवत तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. याच जबरदस्तीत चाकू हिनाच्या हाती आला आणि त्यावेळी तिने क्षणाचाही विचार न करता त्याच्यावर चाकूने सपासप वार केले. जोपर्यंत कालूचा मृत्यू होत नाही तोपर्यंत हिनाने कालूच्या गळ्यावर चाकू दाबून धरला. इतक्या दिवस सहन करत असलेला अन्याय एका झटक्यात संपवल्याचं हिनाने सांगितलं. हा सगळा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांनी हिनाविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करत तिला अटक केली आहे.   मुंबई सेंट्रल स्टेशनवर शाळेतल्या मुलींचा विनयभंग, किळसवाणा VIDEO आला समोर
  First published: