Home /News /national /

जे.पी. नड्डा भाजपचे नवे 'चाणक्य', अध्यक्षपदी बिनविरोध निवड

जे.पी. नड्डा भाजपचे नवे 'चाणक्य', अध्यक्षपदी बिनविरोध निवड

जे.पी. नड्डा यांची अध्यक्षपदावर बिनविरोध निवड करण्यात आली.

    नवी दिल्ली, 20 जानेवारी : भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची अखेर पक्षाच्या अध्यक्षपदी वर्णी लागली आहे. जे.पी. नड्डा यांची अध्यक्षपदावर बिनविरोध निवड करण्यात आली. नड्डा हे 2022 पर्यंत भाजपचे अध्यक्ष म्हणून काम पाहतील. रविवारी झालेल्या बैठकीमध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मुख्यमंत्री विजय रूपाणी, मुख्यमंत्री त्रिवेंद्र रावत, धर्मेंद्र प्रधान, अनुराग ठाकुर, यूपी भाजपचे अध्यक्ष स्वतंत्र देव सह अन्य मोठे नेते हजर होते. जेपी नड्डा यांची राजकीय सुरुवात ही महाविद्यालयीन राजकारणापासून सुरू झाली. अनेक वर्षांपासून त्यांना संघटनेचा अनुभव आहे. स्वच्छ प्रतिमा असलेले नड्डा यांची संघाशीही (RSS) त्यांची चांगली जवळीक आहे. भाजपचे वरिष्ठ नेता राधामोहन सिंह (Radhamohan Singh) हे पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षाच्या निवडीसाठीच्या प्रक्रियेत प्रभारी आहे. राष्ट्रीय अध्यक्ष निवडीसाठी 20 जानेवारीपर्यंत अर्ज दाखल केले जाणार आहे आणि त्यानंतर निवड प्रक्रिया सुरू होईल. कोण आहेत जे.पी. नड्डा? - जन्म - 2 डिसेंबर 1960 - नड्डा मूळचे हिमाचल प्रदेशचे - 10 वर्षं अभाविपमध्ये विविध जबाबदाऱ्या - 1993 ते 2012 या काळात 3 वेळा आमदार - 1998 साली पहिल्यांदा कॅबिनेट मंत्रिपद - 2010मध्ये दिल्लीत काम करण्यास सुरुवात - युपीए सरकारविरोधात रणनीती आखण्यात महत्वाची भूमिका - नरेंद्र मोदी, अमित शाहांचे विश्वासू सहकारी - एप्रिल 2012 मध्ये राज्यसभेवर निवड - जून 2014 साली केंद्रीय कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ - 2019 लोकसभा निवडणुकीत पक्षाकडून उत्तर प्रदेशची जबाबदारी - जून 2019 - भाजप कार्याध्यक्षपदी निवड - शांत आणि मनमिळावू स्वभाव - संघटनात्मक क्षमतेसाठी भाजपमध्ये प्रसिद्ध अशी होते भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षाची निवड भाजपमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष निवड ही सर्व सहमतीने आणि कोणत्या लढतीविना बिनविरोध होण्याची परंपरा आहे. यावेळीही हीच परंपरा कायम राखली जाणार आहे. नवीन अध्यक्षाच्या निवडीसह पक्षातील मागील अध्यक्ष अमित शहा यांच्या साडेपाच वर्षांपेक्षाचा कार्यकाळ संपुष्टात येईल. शहा यांचा कार्यकाळ हा निवडणुकांसाठी सर्वात चांगला कार्यकाळ होता. परंतु, काही राज्यांमध्ये भाजपला पराभवाचा सामनाही करावा लागला. जुलै महिन्यात कार्यकारी अध्यक्ष जेपी नड्डा यांची निवड झाली होती. मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममध्ये अमित शहा यांची गृहमंत्रिपदी निवड झाली. त्यामुळे राष्ट्रीय अध्यक्ष कोण असणार यासाठी नावांचा शोध सुरू होता. कारण आतापर्यंत पक्षात 'एक व्यक्ती एक पद' ही परंपरा पहिल्यापासून कायम आहे.
    Published by:Akshay Shitole
    First published:

    Tags: Amit Shah, J p nadda

    पुढील बातम्या