जम्मू-काश्मीरमध्ये सोशल मीडियावरील बंदी उठवली

एकूण 22 सोशल मीडिया साइट्सच्या वापरावर हटवली बंदी

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: May 27, 2017 01:33 PM IST

जम्मू-काश्मीरमध्ये सोशल मीडियावरील बंदी उठवली

27 मे : जम्मू-काश्मीरमध्ये सोशल मीडियावर लादण्यात आलेली बंदी अखेर उठवण्यात आली आहे. जम्‍मू-काश्‍मीरमध्ये सरकारने फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि ट्विटर यासारख्या एकूण 22 सोशल मीडिया साइट्सच्या वापरावर बंदी लादली होती.

काश्‍मीर खोर्‍यात उसळलेला हिंसाचार आणि अफवांमुळे युवकांकडून होत असलेली दगडफेक, जाळपोळ यामुळे जम्‍मू काश्‍मीरच्‍या काही भागात तणावाचे वातावरण निर्माण झालं होतं. ही परिस्थिती आणखी चिघळू नये, म्हणून केंद्र सरकारने सोशल मीडियाच्या वापरावर निर्बंध आणले होते. त्यामुळे सुरक्षा यंत्रणांना परिस्थिती हाताळण्यात मदत झाली होती. मात्र, आता काही प्रमाणात परिस्थिती आटोक्यात आल्यानंतर, ही बंदी उठवण्याची मागणी वारंवार करण्यात येत होती.

अखेर केंद्राने याबाबत विचार सर्वंकष विचारविनिमय करून ही बंदी उठवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र आता, हिजबुल मुजाहिदीनचा कमांडर सबजार अहमदच्या मृत्यूनंतर परिस्थिती अजूनच चिघळली तर या निर्णयाबद्दल फेरविचार होण्याचीही शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 27, 2017 01:33 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...