माणसांप्रमाणे प्राण्यांसाठी येणार कोरोनाची लस; भारतातील शास्त्रज्ञांची तयारी सुरू

माणसांप्रमाणे प्राण्यांसाठी येणार कोरोनाची लस; भारतातील शास्त्रज्ञांची तयारी सुरू

IVRI आणि IIT-Rookee एकत्रितरित्या यावर काम करणार आहे.

  • Share this:

बरेली, 02 जून : माणसांचा कोरोनाव्हायरसपासून (coronavirus) बचाव करण्यासाठी लस (vaccine) विकसित होते आहे. मात्र आता प्राण्यांसाठीही (animal) लस बनवण्याचा विचार आहे. भारतातील शास्त्रज्ञांनी त्या दिशेनं तयारी सुरू केली.

बरेलीतील इंडियन वेटरनरी रिसर्च इन्स्टिट्युट (IVRI) प्राण्यांसाठी कोरोना लस, टेस्ट किट बनवणार आहे. आयआयटी रूकीसह (IIT-Rookee) ही लस विकसित केली जाणार आहे.

भारतात आतापर्यंत कोणत्याही प्राण्याला कोरोनाव्हायरसची लागण झालेली नाही. मात्र यूएसमध्ये एक वाघ आणि हाँगकाँगमध्ये कुत्रे कोरोना पॉझिटिव्ह आढळले. त्यामुळे भविष्यात प्राण्यांमध्ये हा व्हायरस पसरण्याचा धोका लक्षात घेत आतापासूनच प्राण्यांनाही कोरोनाव्हायरसपासून वाचवण्यासाठी लस तयार केली जाते आहे.

हे वाचा - भारीच आहे! Coronavirus पासून बचाव करणार 'हे' बूट

टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना IVRI चे संचालक आर.के. सिंग यांनी सांगितलं, "इंडियन काऊन्सिल ऑफ अॅग्रिकल्चर रिसर्च (ICAR) चे डायरेक्टर जनरल यांच्या निर्देशानुसार, आम्ही पाळीव आणि जंगली प्राण्यांसाठी कोरोना लस विकसित करण्याचा विचार करत आहोत. तसंच लॅब आणि फिल्डवर वापरता येईल अशी डानोस्टिक टेस्ट तयार करण्याचाही आमचा विचार आहे"

हे वाचा - कोरोना योद्धे डाॅ. चित्तरंजन भावे यांच्या मृत्यूबद्दल IMA ने केला खुलासा

तज्ज्ञांच्या मते, भविष्यात प्राण्यांमध्ये हा व्हायरस पसरला तर व्हायरस आपल्यात जेनेटिक बदल करेल आणि तेदेखील आजारी पडतील.

"त्यामुळे प्राण्यांमधील कोरोनाव्हायरसचं संक्रमण आणि त्यांच्यामध्ये त्याचा प्रसार होण्यापासून रोखणं यादिशेनंही आम्ही अभ्यास करत आहोत", असंही ते म्हणालेत.

हे वाचा - गूड न्यूज! कोरोनाची एक लस ट्रायलच्या दुसऱ्या टप्प्यात, दुसरी 99% प्रभावी

First published: June 2, 2020, 7:34 PM IST

ताज्या बातम्या