डोनाल्ड ट्रम्प यांची कन्या इव्हांका हैदराबादेत

डोनाल्ड ट्रम्प यांची कन्या इव्हांका हैदराबादेत

इव्हांका ट्रम्प आणि पंतप्रधान मोदी एकाच मंचावर उपस्थित राहणार आहेत.

  • Share this:

28 नोव्हेंबर : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची कन्या इव्हांका ट्रम्प भारतात दाखल झालीये. सोमवारी रात्री उशिरा त्यांचं हैदराबाद विमानतळावर आगमन झालंय.

हैदराबादमध्ये आजपासून "Global Entrepreneurship Summit" सुरू होतेय. त्यासाठी इव्हांका ट्रम्प आणि पंतप्रधान मोदी एकाच मंचावर उपस्थित राहणार आहेत. इव्हांका या अधिकृतपणे व्हाईट हाऊसच्या वरिष्ठ सल्लागार आहेत. आणि त्या पदाची जबाबदारी स्वीकारल्यापासून त्यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे.

ज्या परिषदेसाठी त्या आल्या आहेत, त्याची थीम Women First, Prosperity for all.. अर्थात महिलांना प्राधान्य, सर्वांची सुबत्ता अशी आहे. इव्हांका या महिला सक्षमीकरणासाठी बरंच काम करतात. आणि या परिषदेला जे अमेरिकेचं शिष्टमंडळ आलंय, त्याचं नेतृत्वही त्याच करतायेत.

दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी इव्हांका यांच्यासाठी सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यात आलीये. गेल्या २ दिवसांपासून हैदराबाद शहराला छावणीचं स्वरुप आलंय. अमेरिकेतल्या सिक्रेट सर्व्हिसचे अधिकारी अनेक दिवसांपासून भारतात आहेत. हैदराबाद पोलीस आणि भारताच्या एसपीजी बरोबर समन्वय साधून इव्हांका यांच्या सुरक्षेची काटेकोर व्यवस्था केली गेलीय.

हैदराबाद पोलिसांचे अडीच हजार कर्मचारी तैनात करण्यात आलेत. अमेरिकेच्या अध्यक्षाप्रमाणेच त्याच्या कुटुंबीयांनाही सिक्रेट सर्व्हिसच सुरक्षा पुरवली जाते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 28, 2017 09:31 AM IST

ताज्या बातम्या