विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडून काँग्रेसने घ्यावेत हे 3 धडे!

निवडणुकांच्या निकालानंतर काँग्रेसला आत्मपरिक्षण करण्याची संधी आहे.

News18 Lokmat | Updated On: Oct 25, 2019 01:54 PM IST

विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडून काँग्रेसने घ्यावेत हे 3 धडे!

नवी दिल्ली, 25 ऑक्टोबर: लोकसभा निवडणुकीत आलेल्या मोदी त्सुनामीनंतरच्या दोन महत्त्वाच्या राज्यातील विधानसभेचे निकाल जाहीर झाले आहेत. या दोन्ही राज्यात भाजपने यश मिळवले असले तरी जसे यश त्यांना हवे होते तसे मिळाले नाही. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात भाजप स्वबळावर सत्ता मिळवेल की काय अशी चर्चा होती तर हरियाणामध्ये देखील मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्या नेतृत्वाखाली भाजप क्लीन स्वीप करेल अशी चर्चा होती. या दोन्ही राज्यात काँग्रेस स्पर्धेतच नसल्यासारखे चित्र होते. दोन्ही राज्यातील विधानसभेच्या निकालाने काँग्रेसला काही धडे शिकवले आहेत. या निवडणुकांच्या निकालानंतर काँग्रेसला आत्मपरिक्षण करण्याची संधी आहे.

महाराष्ट्र असो की हरियाणा या दोन्ही राज्यात भाजप सहज सत्ता मिळवेल याबाबत निश्चिंत होती. निकालाच्या आधी भाजपने हरियाणात 90 पैकी 75 जागा मिळतील असा दावा केला होता. तर महाराष्ट्रात देखील स्वबळावर सत्ता मिळेल असा दावा केला होता. निकालानंतरचे चित्र मात्र काही वेगळेच निघाले. हरियाणामध्ये काँग्रेस पक्ष विस्कळीत होता. काही आठवडे येथे निवडणुकीसाठीची समितीही नियुक्त केली नव्हती. राज्याचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी एक स्वच्छ सरकार चालवल्याचे चित्र होते. अशी परिस्थिती असताना काँग्रेसने चांगली कामगिरी केली.

गुरुवारी जेव्हा निकाल समोर येऊ लागले तेव्हा काँग्रेसला देखील अशा निकालाची अपेक्षा नव्हती. या दोन्ही राज्यातील निकालाने काँग्रेसला 3 महत्त्वाचे धडे मिळाले आहेत. पहिला म्हणजे राज्यातील स्थानिक नेत्यांचे महत्त्व होय. दोन्ही राज्यात पुन्हा एकदा स्थानिक नेत्यांची भूमिका किती महत्त्वाची आहे हे समोर आले. त्याच बरोबर या राज्यातील स्थानिक नेत्यांनी केंद्रीय नेतृत्वावर अवलंबून न राहता स्वत:च्या बळावर निवडणुकीत चांगली कामगिरी केली. महाराष्ट्रात तर काँग्रेस नेतृत्वहीन आणि अदृश्य होती. राज्यातील गटबाजीमुळे पक्ष आणखी कमकूवत झाला होता. अशा परिस्थितीत देखील जनतेने काँग्रेसला मत दिले.

हरियाणामध्ये निवडणुकीच्या आधी कुमारी शैलजा यांना अध्यक्ष करण्याचा निर्णय काँग्रेसच्या फायद्याचा ठरला. त्याआधी अध्यक्ष असलेल्या तंवर यांची नियुक्ती राहुल गांधी यांनी केली होती. या नियुक्तीला प्रचंड विरोध झाला होता. शैलजा यांच्यामुळे गैर जाट मते मिळवण्यात काँग्रेसला यश आले.

दोन्ही राज्यातील निकालामुळे काँग्रेसला मिळालेला तिसरा धडा म्हणजे नेतृ्त्वासंदर्भात लवकरात लवकर निर्णय घेणे होय. काही महिन्यापूर्वीच सोनिया गांधी यांना अंतरिम अध्यक्ष म्हणून नियुक्त केले होते. पण विधानसभा निवडणुकीत त्यांनी एक सभा देखील घेतली नाही. राहुल गांधी यांनी हरियाणामध्ये फक्त दोन आणि महाराष्ट्रात 5 सभा घेतल्या. पक्षाचे अनेक नेते निवडणुकीच्या प्रचारात दिसलेच नाहीत. या निकालावरून हेच स्पष्ट होते की दोन्ही राज्यातील काँग्रेसच्या यशात राहुल गांधी यांचे योगदान काहीच नव्हते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 25, 2019 01:54 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...