भोपाळ, 11 ऑक्टोबर : कठीण काळात साथीदाऱ्याने साथ द्यावी हे वचन लग्नाच्या सप्तपदीतही दिलं जातं. कोणी आजारी असेल तर दुसरा त्याची काळजी घेतो. मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये राहणारे रिटायर्ड इंजिनीअर ज्ञान प्रकाश या दिवसात चर्चेत आहेत. आपल्या आजारी पत्नीसाठी यांनी घराच रुग्णालयात केलं आहे. आपल्या घरात त्यांनी ऑक्सीजन सिलेंडरपासून व्हेंटिलेटरपर्यंत सर्व व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे. ज्ञान यांनी डॉक्टरांचा कोर्स केलेला नाही. पण आपल्या पत्नीची काळजी ते कोणत्याही डॉक्टरपेक्षा अधिक चांगली घेत आहे.
ज्ञान प्रकाश यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, त्यांची पत्नी कुमुदनी श्रीवास्तव यांना अस्थमाचा त्रास आहे. त्यांचं वय 72 वर्षे आहे. अनेकवेळा त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. गेल्या 4 वर्षात अनेकदा त्यांना रुग्णालयात भर्ती करण्यात आलं. मात्र गेल्या वर्षी जेव्हा त्या रुग्णालयातून घरी आल्या तेव्हा घराचं रुपचं बदललं होतं. त्यांनी घरातच ऑक्सीजन पाइपलाइनची फिटिंग केली. सक्शन मशीन, नेब्युलायजर, एअर प्युरीफायर आणि व्हेंटिलेटर लावलं. त्यांनी अख्खी एक खोली आयसीयूमध्ये बदलली आहे. त्यांची ही कथा समोर आल्यानंतर लोकांकडून त्यांची तब्येत लवकर बरी होण्याची प्रार्थना केली जात आहे.
हे ही वाचा-ही विकृतीच! धोनीच्या मुलीवर बलात्काराची धमकी; शिवसेना खासदार भडकल्या
At 74, to look after ailing wife 24x7 x 1year, monitor Oxygen ,regulate oxygen supply, change cylinder,Ventilator and like Hospital ICU Nursing,cooking, household work, attending Supreme, High Court, NGT, drafting , filing Petitions, innovation, Tweeting by virtue of my training https://t.co/T3iN5nbrqe pic.twitter.com/3QWrRMOfNX
— Gyan Prakash (@Jabalpursafety) October 5, 2020
कारही बनवली रुग्णवाहिका
त्यांनी आपल्या कारमध्येही ऑक्सीजन बसवले आहे. कारला एकप्रकारे रुग्णवाहिकाच बनवली आहे. पत्नीला जेव्हा कधी तातडीने रुग्णालयात घेऊन जावं लागतं, तेव्हा याच कारमधून नेलं जातं. ते दर आठवड्याला 2 ऑक्सीजन सिलेंडर मागवतात. ते म्हणतात की, या कामात त्यांचे इंजिनीअरचे शिक्षण कामी आलं. ते सातत्याने पल्स ऑक्सीमीटर आणि ऑक्सीजन मीटर मॉनिटर करीत असतात. त्यानुसार ऑक्सीजनचा पुरवठा करतात. त्यांनी एक कायमस्वरुपी नर्सदेखील नेमली आहे. जी त्यांच्या पत्नीची काळजी घेते.
मुलगा-मुलगी अमेरिकेत राहते
त्यांची पत्नी गणिताची शिक्षिका आहे. आजारी असल्याकारणाने त्यांनी निवृत्ती घेतली आहे. त्यांचा मुलगा सॉफ्टवेअर इंजिनीअर असून अमेरिकेत राहतो. मुलगी शिकागोमध्ये असते. मुलं दररोज व्हिडीओ कॉल करतात. त्यांनी घरात एक कुटुंब आपल्या सोबत ठेवलं आहे, जे त्यांच्यांशी संवाद साधतं आणि पत्नीची काळजी घेतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Madhya pradesh