CBDT ने 88,652 कोटींचा टॅक्स केला रिफंड, तुम्हाला मिळाला नसेल तर असा प्रयत्न करा!

CBDT ने 88,652 कोटींचा टॅक्स केला रिफंड, तुम्हाला मिळाला नसेल तर असा प्रयत्न करा!

1 एप्रिल 2020 पासून आतापर्यंत सीबीडीटीने 24,66 लाख करदात्यांना 88,652 कोटी रुपयांचा कर परतावा दिला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली 21 ऑगस्ट: इन्कम टॅक्स विभागाने (Income Tax Department) या वर्षात आत्तापर्यंत करधारकांना 88 हजार 652 कोटींचा कर परतावा दिला आहे. त्यात 23.05 लाख कर धारकांना 28,180 कोटी रुपये मिळाले आहेत. तर 1.58 लाख कॉर्पोरेट टॅक्स धारकांना 60,472 कोटी रुपये रिफंड मिळाले आहेत.

आयकर विभागाने शुक्रवारी एका ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे. 1 एप्रिल 2020 पासून आतापर्यंत सीबीडीटीने 24,66 लाख करदात्यांना 88,652 कोटी रुपयांचा कर परतावा दिला आहे. 23,05,726 प्रकरणांमध्ये 28,180 कोटी रुपयांचा आयकर परतावा देण्यात आला आहे. 1,58,280 प्रकरणात 60,472 कोटी रुपयांचा कर परतावा देण्यात आल्याची माहिती विभागाने दिली आहे.

काही गोष्टींची काळजी घेतली तर सगळ्यांनाच आपल्याला परतावा मिळाला किंवा नाही याची माहिती कळू शकणार आहे.

आपले पोर्टल प्रोफाइल उघडताच आपल्याला View returns/forms’ वर क्लिक करावे लागेल.

त्यानंतर ड्रॉप डाऊन मेन्यूमधून Income Tax Returnsवर क्लिक करून सबमिट करा. हायपरलिंक एनरोलमेंट नंबरवर क्लिक केल्यानंतर एक नवीन स्क्रीन उघडेल.

त्यावर आपल्याला फाइल रिटर्न भरण्याची वेळ प्रक्रिया, कर परताव्याची माहिती मिळेल. यात दाखल करण्याच्या तारखेची माहिती, परताव्याची तारीख, प्रक्रिया पूर्ण होण्याची तारीख, परतावा मिळण्याची तारीख आणि देय परतावा याविषयी माहिती असेल.

जर आपला रिफंड मिळाला नसेल तर त्याचं कारणही यावर आपल्याला कळणार आहे.

Published by: Ajay Kautikwar
First published: August 21, 2020, 9:14 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading