पिथोरागड 23 ऑगस्ट: दऱ्या खोऱ्या आणि पर्वतांनी वेढलेल्या उत्तराखंडमध्ये दुर्गम भागात मदत पोहोचवणं हे अतिशय कठिण काम असतं. उत्तराखंडमध्ये दुर्गम भागात जाण्यास अजुनही रस्ते नाही. कित्ये तास पायपीट करून लोक आपला घरी पोहोचत असतात. अशा दुर्गम गावांना आरोग्याच्या सुविधा पुरवणं हे प्रशासनासमोरचं सर्वात मोठं आव्हान आहे. अशाच एका गावातल्या जखमी महिलेला हॉस्पिटलमध्ये पोहोचवत ITBPच्या जवानांनी तिचे प्राण वाचवले. त्याचा थरारक VIDEO आता समोर आला आहे.
अतिशय दुर्गम खेड्यात राहणारी ही महिला जखमी झाली होती. तिला जवळच्या हॉस्पिटलमध्ये तातडीने नेणं आवश्यक होतं. मात्र तिथपर्यंत पोहोचण्यासाठी रस्ता उपलब्ध नव्हता. शेवटी या जवानांनी स्ट्रेचरच्या साह्याने तिला नेण्याचा निर्णय घेतला. 40 किलोमीटरचा हा खडतर रस्ता पार करण्यासाठी त्यांना तब्बल 15 तास लागले.
दऱ्या, खोऱ्या, पहाड, भरून वाहणारे नदी, नाले पार करत या जवानांनी जखमी महिलेला शेवटी हॉस्पिटलमध्ये पोहोचवलं आणि त्या महिलेचे प्राण वाचले. त्यासाठी मात्र या जवानांना मोठी कसरत करावी लागली. मात्र या जिगरबाज जवानांनी आपला जीव धोक्यात घालत त्या महिलेचे प्राण वाचवले.
#WATCH: ITBP jawans travelled 40-km on foot for 15 hours carrying an injured woman on a stretcher from a remote village, Lapsa to Munsyari in Pithoragarh, Uttarakhand yesterday. During this journey, they crossed flooded nullahs & landslide-prone areas: ITBP pic.twitter.com/kTycp5IizR
— ANI (@ANI) August 23, 2020
त्यामुळे देवभूमी समजल्या जाणाऱ्या उत्तराखंडमध्ये आरोग्य सुविधांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कोविड सारखी साथ सुरु असतांना दुर्गम भागात आरोग्य सुविधा पोहोचविणार केव्हा असा प्रश्न आता सामाजित संघटनांनी केला आहे.