बालाकोट एअर स्ट्राइकविषयी इटालियन पत्रकाराने केला मोठा गौप्यस्फोट

एअर स्ट्राइकमध्ये 130 जण मारले गेले आणि जखमी झालेले जैशचे 45 सदस्य पाकिस्तान लष्कराच्या रुग्णालयात उपचार घेत आहेत, असा धक्कादायक खुलासाही या वृत्तात करण्यात आला आहे.

News18 Lokmat | Updated On: May 8, 2019 08:19 PM IST

बालाकोट एअर स्ट्राइकविषयी इटालियन पत्रकाराने केला मोठा गौप्यस्फोट

नवी दिल्ली, 8 मे : बालाकोट इथे भारतीय सैन्याने केलेल्या एअर स्ट्राइकचे पुरावे मागणाऱ्यांना एका इटालियन पत्रकाराच्या रिपोर्टने एक खुलासा मिळाला आहे. फ्रान्सिस्का मारिनो या इटलीच्या महिला पत्रकाराच्या स्ट्रिंजर एशियामध्ये प्रसिद्ध झालेल्या रिपोर्टनुसार, भारताने केलेल्या एअर स्ट्राइकमध्ये जैश ए मोहम्मदचे दहशतवादी मोठ्या प्रमाणावर मारले गेले आहेत. या पत्रकाराने लिहेलेल्या वृत्तानुसार

अजूनही जैशचे 45 जखमी सदस्य पाकिस्तान लष्कराच्या रुग्णालयात उपचार घेत आहेत, असा धक्कादायक गौप्यस्फोट या वृत्तात करण्यात आला आहे.

भारताने केलेल्या एअर स्ट्राइकमध्ये आमचं काहीच नुकसान झालं नाही, असा पाकिस्तानचा दावा आहे. त्यांनी ते सिद्ध करण्याच्या प्रयत्नात काही विदेशी पत्रकारांना बालाकोटला नेऊन आणलं आणि अगदी काही दिवसांपूर्वी भारतीय पत्रकारांनीही बालाकोटला येऊन खात्री करावी, असंही सांगितलं. या सगळ्या पार्श्वभूमीवर एका इटालियन पत्रकाराचा रिपोर्ट प्रसिद्ध झाला आहे. भारताच्या एअर स्ट्राइकमध्ये जैशचे 130 ते 170 सदस्य मारले गेले आहेत, असं या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.


बालाकोटमध्ये अजूनही पाकिस्तानी लष्कराचा वेढा, काहीच झालं नसल्याचा कांगावा

Loading...

एअर स्ट्राइकचे पुरावे कुठे आहेत? पुन्हा बोलले सॅम पिट्रोडा

पत्रकार आणि लेखिका फ्रान्सिस्का मारिनो यांनी StringerAsia मध्ये 26 फेब्रुवारी झालेल्या बालाकोट एअरस्ट्राइकसंदर्भात सविस्तर वृत्तलेख लिहिला आहे. 'एअरस्ट्राइकमध्ये 130 ते 170 जण मृत्यूमुखी पडले. काही जण जागीच ठार झाले, तर काही जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. एअरस्ट्राईकमध्ये ठार झालेल्यांमध्ये 11 प्रशिक्षकांचा समावश होता. ते बाँब कसा बनवायचा यापासून ते शस्त्रास्त्र चालवण्याचं प्रशिक्षण देणारे होते. यातले दोन प्रशिक्षक अफगाणिस्तानचे होते', असं मारिनो यांनी त्यांच्या वृत्तात म्हटलं आहे.

या हल्ल्यात मृत्यू झाला त्यांच्या घरी जाऊन नातेवाईकांना मदत म्हणून काही रोख रक्कमही जैश ए मोहम्मदकडून देण्यात आली. त्यांनी या सदस्यांच्या मृत्यूची जाहीर वाच्यता करू नये, यासाठी हे पैसे देण्यात आल्याचं मारिनो यांनी म्हटलंय.

सूत्रांचा हवाला देत त्यांनी लिहिलंय की, बालाकोटच्या त्या तळावर बाँबहल्ला झाल्यानंतर अडीच तासांनी तिथे पाकिस्तानी लष्कराची एक तुकडी पोहोचली. बालाकोटपासून 20 किमी अंतरावर शिंकियारी नावाच्या गावात हा तळ असल्याचं या पत्रकार महिलेनं म्हटलं आहे.


Balakot : 80 टक्के बाँबनी साधलं लक्ष्य; हवाई दलाने सरकारकडे फोटोंसह सोपवले Air Strike चे पुरावे

पाकिस्तानी सैन्यानं पुन्हा एकदा बालाकोटला जाण्यापासून पत्रकारांना थांबवलं, दिली ही कारणं

'पाकिस्तानच्या लष्कराची तुकडी बालाकोटच्या तळावर पोहोचल्यावर तातडीने जखमींना लष्करी डॉक्टरांकके सोपवण्यात आलं. जखमींना हरकत उल मुजाहिदीनच्या तळावर उपचारासाठी नेण्यात आलं. तिथे हे पाक लष्करातले डॉक्टर उपस्थित होते. स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या जखमींपैकी 45 जण अजूनही तिथे उपचार घेत आहेत. दाखल झालेल्यांपैकी 20 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला', असं त्यांनी लिहिलं आहे.

बालाकोट एअर स्ट्राइकचे पुरावे- फ्रान्सिस्का मारिनो


बालाकोटमध्ये असलेल्या जैशच्या या तळाविषयी सविस्तर लिहिताना त्यांनी म्हटलंय, 'एका डोंगराच्या तळाशी जिथे आता तालीम उल कुराण असा फलक लिहिला आहे, त्याच डोंगरावर चढून गेल्यानंतर जैश ए मोहम्मदचा कँप होता. पण तिथेच पूर्वी जैशचा प्रशिक्षण तळ होता. हा भाग अजूनही पाक लष्कराच्या ताब्यात आहे. कॅप्टन रँकचा मुजाहिद बटालियनचा अधिकारी तिथे तैनात आहे. त्या डोंगरावरच्या कँपच्या ठिकाणी जाण्यास प्रतिबंध आहे. '


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 8, 2019 08:03 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...