Home /News /national /

नेत्याच्या घरात IT ची छापेमारी; 50 लाखांची रोकड, सव्वा कोटींचे दागिने आणि UK कनेक्शन आलं समोर

नेत्याच्या घरात IT ची छापेमारी; 50 लाखांची रोकड, सव्वा कोटींचे दागिने आणि UK कनेक्शन आलं समोर

तब्बल 40 तास या खासदाराच्या घरात आयकर विभागाची छापेमारी सुरू होती

    लखनऊ, 31 ऑक्टोबर : उत्तर प्रदेशातील बिजनौर येथील बहुजन समाज पार्टीचे खासदार मलूक नागर b त्यांच्या भावाचे घर आणि व्यवसायाच्या ठिकाणी आयकर विभागाने छापेमारी केली आहे. यामधून तब्बल 50 लाख रुपयांची कॅश, सव्वा कोटी रुपयांचे दागिने सापडले आहेत. सोबतच टीमला घरातून कंपनीच्या सुरक्षा प्रीमिअमदेखील मोठ्या संख्येत मिळाले आहेत. तपासात ही बाब समोर आली आहे की, कंपनीजवळ बँक वा लोकांचे लोन आहेत. असे असतानाही ते दुसऱ्यांना लोन देत आहे. कंपनीची जी विक्री दाखविण्यात आली आहे, त्याचे लोन आणि एडवान्सच्या अनुरुप दिसत नाहीत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सुरक्षा प्रीमिअमच्या माध्यमातून गोंधळ घातल्याची सूचना आयकर विभागाला मिळाली होती. विभाग या सूचनेवर बऱ्याच काळापासून काम करीत होती. 6 बँक लॉकर मिळाले कंपनीचे शेअरहोल्डर आपल्या उत्पन्नाच्या स्त्रोताची माहिती देऊ शकलेले नाहीत. छापेमारीदरम्यान टीमला 6 बँक लॉकर मिळाले आहेत. आयकर विभागाची टीम या प्रकरणात अधिक तपास करीत आहे. 28 ऑक्टोबर रोजी आयकर विभागाने मलूक नगरमधील नोएडा, हापुड आणि बिजनौर स्थित ठिकाण्यांवर छापा मारला होता. ही कारवाई 29 ऑक्टोबर रोजी रात्री 12वाजता संपली. लखनऊनच्या टीमने ही कारवाई केली होती. एका छताखाली राहत होत्या 20 कंपन्या आयकर विभागाच्या तपासात अशी माहिती मिळाली आहे की, एका छताखील वेगवेगळ्या नावांच्या 20 कंपन्या काम करीत होत्या. यापैकी अनेक कंपन्या डमी होत्या, यामध्ये कोणतेही ऑपरेशन केले जात नव्हते. तपासात मिळालेल्या माहितीनुसार यातील एक ग्रुप मेंबरचे वित्तीय हित ब्रिटेन आधारित एका परदेशी कंपनीसोबत होता. याची एक प्रॉपर्टी लंडनमध्ये होती. आयकर विभागाची टीम याच्या स्त्रोताचा शोध घेत आहे. काही अधिकाऱ्यांच्या मते यामध्ये बेनामी संपत्ती असल्याची शक्यता आहे. कारण उत्पन्नाहून अधिक संपत्ती मिळाली आहे. अनेक प्रकरणात स्त्रोताबद्दल माहिती मिळाली नाही. सर्वसाधारपणे बेनामी संपत्ती भारत सरकारकडे जाते. आणि 3 वर्षांपर्यंत तीन ते 7 वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा दिली जाते. राजकीय वर्तुळात मात्र बसपा खासदाराच्या घरात छापेमारी करणं हे विरोधकाला संपविण्यासाठी करण्यात आली आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    पुढील बातम्या