'निर्णय पूर्णतः मोदींवरच अवलंबून', ट्रम्प यांच्याकडून पुन्हा काश्मीरप्रश्नी मध्यस्थीसाठी ऑफर

'निर्णय पूर्णतः मोदींवरच अवलंबून', ट्रम्प यांच्याकडून पुन्हा काश्मीरप्रश्नी मध्यस्थीसाठी ऑफर

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा काश्मीरचा राग आळवला आहे. काश्मीर वादप्रकरणी मध्यस्थी करण्याची ऑफर ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारताला देऊ केली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 2 ऑगस्ट : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा काश्मीरचा राग आळवला आहे. काश्मीर वादप्रकरणी मध्यस्थी करण्याची  ऑफर ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारताला देऊ केली आहे. डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं तर काश्मीर वादात मध्यस्थी करण्यास मी तयार आहे. अमेरिकेची मदत हवीय की नको, याचा निर्णय पूर्णतः मोदींवर अवलंबून आहे. भारत आणि पाकिस्तानमधील काश्मीर वाद गेल्या कित्येक वर्षांपासून सुरूच आहे. पंतप्रधान मोदी आणि इमरान खान या दोघांची ईच्छा असल्यास या गंभीर विषयात आम्ही हस्तक्षेप करण्यास तयार आहोत. तसंच यापूर्वीही मी यासंदर्भात पाकिस्तान आणि भारताच्या पंतप्रधानांसोबत चर्चा केली असल्याचा पुर्नउच्चारही ट्रम्प यांनी यावेळेस केला.

(वाचा : EVM वरून रान पेटणार! राज ठाकरेंसह विरोधकांचा 21 ऑगस्टला मुंबईत मोर्चा)

(वाचा:Jammu Kashmir : शोपियाँमध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, एका जवानाला वीरमरण)

'काश्मीरप्रश्नी पाकिस्तानसोबतच होणार चर्चा'

तर दुसरीकडे,काश्मीरप्रश्नी भारत फक्त पाकिस्तानशीच चर्चा करेल, अशा शब्दांत परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी अमेरिकाला ठणकावून सांगितलं आहे.  काश्मीरप्रश्नी जी काही चर्चा करायची असेल, त्यासाठी आम्हाला कोणाच्याही मध्यस्थीची गरज नाही, असे थेट जयशंकर यांनी सांगितलं आहे.

अमेरिकेचे आणि भारताचे परराष्ट्र मंत्री बँकॉकमध्ये शुक्रवारी (2 ऑगस्ट)एका बैठकीनिमित्त एकत्र आले होते. यादरम्यान, जयशंकर यांनी माइक पोम्पिओ यांच्यासमोर थेट आपली भूमिका मांडली.

नेमकं काय आहे प्रकरण?

काश्मीर मुद्यावर भारत आणि पाकिस्तानदरम्यान मध्यस्थी करण्याचा प्रस्ताव अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला. दोन्ही देशांनी विचारणा केली तर आपण मदतीसाठी तयार आहोत, असे ट्रम्प म्हणाले होते. जानेवारी 2016 मधील पठाणकोट हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानशी चर्चा केलेली नाही. दहशतवाद आणि चर्चा एकत्र होऊ शकत नाही, असे स्पष्टपणे भारतानं पाकिस्तानला ठणकावून सांगितलं आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा

ट्रम्प यांनी असा दावा केली, 'पंतप्रधान मोदी आणि मी गेल्या महिन्यात झालेल्या जी-20 शिखर संमेलनात काश्मीर मुद्यावर चर्चा केली. जेथे पंतप्रधान मोदींनी काश्मीर प्रश्नी मध्यस्थीची विनंती केली होती. पुढे ट्रम्प असंही म्हणाले की, 'मी दोन आठवड्यापूर्वी पंतप्रधान मोदींसोबत होतो आणि यावेळेस आम्ही काश्मीर मुद्यावर चर्चा केली. मोदींनी विचारलं की तुम्ही मध्यस्थी कराल का?... मी विचारले - कुठे ?... तेव्हा मोदी म्हणाले, 'काश्मीरचा मुद्दा'

हप्ता दिला नाही म्हणून हॉटेल मालकाला मारहाण, पोलिसाच्या दादागिरीचा पाहा CCTV

Published by: Akshay Shitole
First published: August 2, 2019, 12:55 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading